पहूर येथे तरुणावर शस्त्राने वार;सळईने हल्ला करून तरुणानेही घेतला बदला:जखमी तरुण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल‎

पहूर येथील पवन बनकर या तरुणाने गौरव गोयर या तरुणावर रविवारी तीष्ण हत्याराने वार केल्याचा प्रकार घडला होता. त्याचा बदला म्हणून गौरव गोयर याने दोन भावांसह पवन बनकर याच्यावर लोखंडी सळईने वार करून बदला घेतला. यात पवन बनकर हा गंभीर जखमी झाला असून त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गौरव भोयर व पवन बनकर या दोघांमध्ये किरकोळ वाद होते. यातून रविवारी बनकर याने गोयर याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. रविवारी बनकर याने केलेल्या हल्ल्यात गोयरच्या हाताला १७ टाके पडले. तर गोयर यांच्यासह नातेवाइकांनी पवन बनकर याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर तीन दिवसात गोयर याच्या कडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. मंगळवारी गौरव गोयर, आदित्य गोयर व नीरज गोयर या तिघांनी पवन बनकर याला शेतात गाठून लोखंडी सळईने जबर मारहाण केली. यात पवन याचा हात मोडला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यास उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. जखमी असलेल्या बनकर याने पोलिसांना ही माहिती दिली. गेल्या काही काळात पहूर परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले स्थानिक पोलिस अनेक आरोपींना किंवा उपद्रवींना ओळखतात. तक्रारी होऊनही अशा आरोपींवर योग्य ती कारवाई होत नसल्याने पहूर सह परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी पाहता ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्या व गुन्हेगारीला आळा घालावा. अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow