अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील माहितीपट:डॉ. सविता सरनाईक निर्मित 'पप्पा सांगा कुणाचे' माहितीपटाच्या प्रीमियरला शरद पवार, नाना पाटेकरांची उपस्थिती

चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या सशक्त अभिनयाने गाजलेले अभिनेते-गायक अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील माहितीपट 'पप्पा सांगा कुणाचे' चा प्रीमियर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. त्यांच्या कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या प्रीमियर शोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, रंगकर्मी व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अरुण सरनाईक यांचा संपूर्ण जीवनप्रवास, चित्रपट, नाटके, गाणी आणि दुर्मिळ छायाचित्रे असलेल्या www.arunsarnaik.com या संकेतस्थळाचे उद्घाटन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सरनाईक व नाईकनवरे कुटुंबीयांच्या वतीने कोल्हापूर मधील उदयोन्मुख गुणी अभिनेत्याला तसेच शास्त्रीय व नाट्यसंगीत क्षेत्रातील कलाकाराला अरुण सरनाईक शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही करण्यात आली. डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी आपल्या मनोगतातून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "चित्रीकरण आणि नाटकांचे दौरे यांतून वेळ मिळाला की पप्पा थेट घरी येत असत. गल्लीच्या टोकापासून माझ्या नावाने हाका मारत असत." त्या पुढे म्हणाल्या, "मी लहानपणी टॉमबॉय होते. पत्र्यावर चढून पतंग उडवताना अनेकदा जखमी व्हायचो, पण ते रागवत नसत. सायकलवरून आम्ही थेट पन्हाळा गाठत असू." "पप्पांना वाचनाची आवड होती. मोठी झाल्यावर मला उमगले की पप्पा फक्त माझेच नाहीत तर ते रसिकांचे होते आणि नेहमीच राहतील," असेही त्यांनी सांगितले. माहितीपटाचे दिग्दर्शक संतोष पाठारे म्हणाले, "आपल्याकडे जुन्या काळी दस्तऐवजीकरणाची प्रथा नसल्याने हा माहितीपट करणे आव्हानात्मक होते. मात्र उपलब्ध चित्रपट, नाटके, छायाचित्रे आणि आठवणींतून हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे." अरुण सरनाईक यांनी आपल्या सहज अभिनयाने आणि रूबाबदार व्यक्तिमत्त्वाने मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या हेतूने हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

Aug 2, 2025 - 21:22
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow