पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तीन तरुणांचा मृत्यू:कोथरूड, सिंहगड रस्ता आणि हडपसर भागात घडल्या दुर्घटना; दोघे जण गंभीर जखमी

पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कोथरूड, सिंहगड रस्ता आणि हडपसर भागात या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. हडपसर-मुंढवा रस्त्यावर मांजरी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय कुणाल संतोष घाडगे (रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला महेश बबन घाडगे हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल आणि त्याचा चुलत भाऊ महेश हे शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास मुंढवा रस्त्याने जात होते. त्यावेळी हॉटेल धनगरवाड्यासमोर समोरून भरधाव वेगात आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पुढील तपास करत आहेत. कोथरूड भागात भुसारी कॉलनीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २२ वर्षीय ऋतिक एडने (रा. पिंपळे निलख) याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला २३ वर्षीय आकाश अभिजित अजित भेके (रा. जुन्नर) गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ऋतिक आणि त्याचा मित्र आकाश हे बाह्यवळण मार्गावरून कोथरूडमधील भुसारी कॉलनीकडे निघाले होते. सेवा रस्त्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात ऋतिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच ऋतिकचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कुंभार तपास करत आहेत. वडगाव बुद्रुक परिसरात सिंहगड महाविद्यालय रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत २३ वर्षीय स्वप्नील संपतराव पवार (रा. शिवाजीनगर, कडेगाव, जि. सांगली) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालक धनाजी शंकर चव्हाण (वय ४१, रा. ओंकार हाईट्स, नऱ्हे) याला अटक करण्यात आली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी ऋतुजा कदम हिला दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील आणि ऋतुजा हे वडगाव बुद्रुकमधील सिंहगड महाविद्यालय रस्त्याने निघाले होते. त्या वेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसने दुचाकीस्वार स्वप्नील आणि ऋतुजा यांना धडक दिली. अपघातात स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच स्वप्नील याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके तपास करत आहेत.

Aug 2, 2025 - 21:23
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow