मक्रमपूर येथील महिला बचत गटाच्या सेंद्रिय गुळाचा राज्यात पसरला गोडवा:गावामध्ये ‘उमेद’चे १५ महिला बचत गट
प्रतिनिधी | अकोला मक्रमपूर (ता. अकोट) येथील साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावात १५ महिला बचत गट कार्यरत असून, त्यातील त्यांनी ‘उमेद’च्या माध्यमातून विविध गृहउद्योग सुरु केले असून, त्या माध्यमातून गावांतील १५० महिलांना रोजगार मिळाला. यातील एक १२ महिलांचा बचत गट शेतातच गुऱ्हाळ मांडून सेंद्रिय गुळ व गुळापासूनचे उपपदार्थ तयार करत आहे. या सेंद्रिय गुळाला अकोटसह, अकोला, अमरावती, नागपुरात चांगली मागणी आहे. मक्रमपूर येथील महिला बचत गटातील अध्यक्ष रुपाली जायले यांनी त्यांच्या शेतात चार एकरावर ऊस लावला असून, शेतातातील आणि बाहेरील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करुन शेतातच गुऱ्हाळ मांडून सेंद्रिय गुळ तयार करत आहेत. साध्या गुळाचा दर बाजारात ५० ते ६० रुपये किलो आहे. तर नैर्सगिक प्रक्रियेने तयार केलेल्या या संेद्रिय गुळाचा दर १०० ते ११० रुपये किलो आहे. साध्या गुळाच्या तुलनेत दुप्पट दर असूनही आरोग्याप्रती जागरुकतेचा एक भाग म्हणून नागरिकांकडून या गुळाला चांगली मागणी आहे.शेतातील ऊसापासून गुऱ्हाळातून गूळ तयार करणे, गुळाच्या भेल्या, छोट्या वड्या आणि गुळाच्या पाकापासून काकवी (जेली) निर्मितीपासून ते त्याचे पॅकींग आणि मार्केटींग आदी सर्व कामे या गावातील या बचत गटाशी जुळलेल्या महिला करतात.

What's Your Reaction?






