तिवसाच्या ३३ केव्ही उपकेंद्रात बिघाड:८ तास गडद अंधारात हरवली २० गावे; मध्यरात्रीपर्यंत झटला विभाग

प्रतिनिधी | तिवसा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात अचानक बिघाड झाल्यामुळे पाहता-पाहता रात्रीचे ८ तास उलटून गेल्यावर महावितरण विभागाच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि २० गावांत लखलखाट झाला.एकीकडे गावाची गेलेले वीज पुर्ववत सुरू करण्यासाठी उपकेंद्रावर महावितरण अधिकारी व कर्मचारी झटत होते तर दुसरीकडे वीज अजूनपर्यंत का आली?या प्रश्नाला घेऊन नागरिक संतप्त होऊन वीज वितरण कार्यालयावर धडकत होते.अखेर ३३ केव्ही उपकेंद्रावर पूर्ण महावितरण टीम काम करीत असल्याचे चित्र दिसल्यानंतर संतप्त नागरिकांनी संयम बाळगला. तिवसा येथील ३३ केव्ही उपकेंद्रामध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजता अचानक बिघाड झाला आणि हा बिघाड शोधता-शोधता व दुरुस्ती करता-करता मध्यरात्रीचे २ वाजले होते.दरम्यान तिवसा येथे अमरावती येथील वीज वितरण कंपनीच्या टीमला पाचारण करावे लागले. ८ तासापासून विजेची वाट बघणाऱ्या २० गावांत वीज वितरण कंपनीच्या अथक परिश्रमाने लखलखाट झाला.मात्र, यामुळे नागरिकांना विजेअभावी कमालीचा त्रास सहन करावा लागला तर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मात्र वीज कर्मचाऱ्यांना रात्र जागून काम करावे लागले. तिवसा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील सीटी (वाय-फेज) हा अचानक शनिवारी सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान नादुरुस्त झाला होता. हा फेज दुरुस्त करण्यासाठी तिवसा येथील महावितरण यंत्रणा सतत कार्यरत होती. मात्र,दुरुस्ती कार्याला यश मिळत नसल्याने रात्रीच्या अंधारात त्यांच्या सोबतीला अमरावती येथील महावितरण चाचणी विभागाची यंत्रणा दाखल झाली होती. एकीकडे वीज पुरवठा सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत होता तर दुसरीकडे महावितरणची संपूर्ण यंत्रणा दुरुस्ती कामी लागली होती ही २० गावे होती अंधारात; रात्री २ वाजेनंतर लखलखाट उपकेंद्रात बिघाड झाल्याने तिवसा,शेंदूरजना बाजार, डेहणी, सुरवाडी, आनंदवाडी, सातरगाव, करजगाव, वरुडा,दापोरी,जावरा,फ त्तेपूर,नमस्करी,सारस ी,वणी,ममदापूर,सुल्ता नपूर, काटपूर,इसापूर ही २० गावे पूर्णतः मध्यरात्री २ वाजेपर्यंत अंधारात होती.प्रत्येक गावात नागरिकांना एकच प्रश्न भेडसावत होता,तो म्हणजे वीजपुरवठा केव्हा सुरू होणार?. ज्यावेळी वीज पुरवठा सुरळीत झाला त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

Aug 4, 2025 - 12:23
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow