घृष्णेश्वर मंदिर परिसरात एजंट दिसताच पोलिस घेणार ताब्यात:‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशननंतर 16 जणांना प्रशासनाचा सज्जड दम

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेवाला नमन करण्यासाठी देशभरातून २ लाखांपर्यंत भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. रविवारी रात्री १२ वाजेपासून सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन खुले राहणार आहे. रात्री ३ वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या. सकाळी ६ नंतर मात्र भाविकांना दर्शनासाठी अडीच तास रांगेत उभे राहावे लागणार आहे. दरम्यान, दिव्य मराठीने पहिल्याच सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाने आठवडाभरात १६ जणांना बोलावून घेत सज्जड दम दिला, तर आता घृष्णेश्वर मंदिर परिसरात साध्या वेशात पोलिसांची गस्त असणार आहे. या वेळी एजंट दिसताच त्यास ताब्यात घेतले जाणार आहे. दरम्यान शनिवार, रविवार आणि सोमवार विशेष बंदोबस्तही परिसरात तैनात करण्यात आला आहे. शहरापासून आवघ्या २५ किमी अंतरावर असलेले घृष्णेश्वर मंदिर शेवटचे ज्योतिर्लिंग असण्यासोबतच तीन प्रमुख वैशिष्ट्येही आहेत. मालोजीराजे भोसले आणि अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचे मूळ प्रवेशद्वार दक्षिणेला आहे. शिवाय पूर्वाभिमुख शिवलिंगप्रणाली आहे. म्हणजे शिवशंकरावर अभिषेक झालेले जल पूर्वेकडून बाहेर सोडण्यात आले आहे. याशिवाय रंगमंडपावर शिव, पार्वती, कार्तिक आणि गणेशासह शिवपरिवारातील सदस्यांचे कोरीव काम आहे. यातून हे शेवटचे ज्योतिर्लिंग असल्याचा संदेश देण्यात आला आहे. दर्शनासाठी कोणती घ्यावी काळजी वास्तुशास्त्राचे वैशिष्ट्य या मंदिराचे वास्तुशिल्प दोन टप्प्यांत आहे. पहिल्यात रंगमंडपापर्यंतचा भाग लाल पाषाणात आहे. ज्यावर महाभारत, रामायणातील कथा कोरण्यात आल्या आहेत, तर त्यावर चुना आणि तत्कालीन चिकट पदार्थांचा वापर केलेला आहे. दक्षिणेला द्वार असलेले हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. शिवपिंड भाविकांना आकर्षित करणारी आहे. -योगेश जोशी, अभ्यासक. मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले, अभिषेकावर ३ दिवस बंदी यंदा घृष्णेश्वर मंदिर विकास आणि नियोजनावर प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. ‘दिव्य मराठी’ने २९ जुलै रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल घेत तत्काळ बंदोबस्त वाढवला. शिवाय काही जणांना समजही दिली. मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले आहे. भाविकांना शांततेने दर्शन व्हावे यासाठी अभिषेकावर तीन दिवस बंदी आहे. -कुणाल दांडगे, अध्यक्ष, घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट

Aug 4, 2025 - 12:26
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow