यवत दंगलीस पडळकर, संग्राम जगताप जबाबदार:पोलिसांच्या साक्षीने प्रक्षोभक विधाने, कारवाई करा; शरद पवार गटाची कारवाईची मागणी

पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथील दंगलीला कारणीभूत असणाऱ्या सत्ताधारी महायुतीच्या आमदारांवर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. पक्षाने यासंबंधी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले असून, त्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची नावे घेण्यात आली आहेत. दौंडच्या यवतमध्ये गत आठवड्यात एका समुदायाच्या तरुणाने 1 ऑगस्ट रोजी सकाळी सोशल मीडियावर एक वादग्रस्त स्टेटस ठेवले होते. या पोस्टची माहिती मिळताच गावात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन समुदायांनी एकमेकांवर दगडफेक करून काही दुचाकींची जाळपोळही केली होती. त्यानंतर येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे या दंगलीच्या एक दिवस अगोदरच येथे आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांची सभा झाली होती. त्यानंतर दोन दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून या दंगलीस कारणीभूत असणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय म्हटले आहे शरद पवार गटाने आपल्या पत्रात? पक्षाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, यवत ता. दौंड येथे एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची विटंबना केल्यानंतर दोन दिवसांनी 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता यवत येथे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, जय वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख हेमांगी सखी व इतर काही संघटनाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी नसताना हिंदू जनआक्रोष मोर्चा काढून जाहीर सभा घेतली. सदर सभेला मोठी गर्दी जमविण्यात आली होती. त्या सभेत वरील आमदार व इतर कार्यकर्त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी अतिशय प्रक्षोभक भाषणे केली आहेत. भाषणामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश नव्हता. याउलट क्रियेला प्रतिक्रिया दिली पाहिजे अशा पध्दतीचे जाहीर आवाहन करण्यात आले. वास्तविक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला आरोपीवर कारवाई केलेली होती. कायदा हातात घेऊन शिक्षा देण्याचा कोणाला अधिकार नाही. पोलिसांकडे सर्व पुरावे, पण... मात्र आमदारांनी विधी मंडळात विधान सभा व विधान परिषदेमध्ये घेतलेली शपथ पायदळी तुडवून उपस्थित तरूणांच्या भावना भडकवल्या प्रक्षोभक विधाने केली. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी यवत येथे मोठा हिंसाचार झाला. त्यामध्ये जाळपोळ, तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली हे कृत्य व घटना स्थानिक पोलिसांच्या साक्षीने झालेली आहे. यवतमधील तीन-चार दिवस तणावांचे वातारण पोलिसांना ज्ञात होते. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. वास्तविक सदर सभा ही वातावरण चिघळवणारी व धार्मिक तेढ निर्माण होत असताना स्थानिक पोलीसांनी राजकीय दवावाखाली राहून अप्रत्यक्षपणे बेकायदा कृतीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट होत आहे. या आमदारांची राज्यात सर्वत्र प्रक्षोभक विधाने वास्तविक सदर आमदारांनी कायदयावर विश्वास ठेवून समाजात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणे अपेक्षित असताना याउलट ते वारंवार प्रक्षोभक व भावना भडकवणारी विधाने करून धार्मिक तेढ निर्माण करत असतात याचे अनेक पुरावे जगजाहीर उपलब्ध आहेत. वरील आमदार हे राज्यात वारंवार ठिक ठिकाणी वेकायदारितीने भारतीय संविधानाच्या विपरीत भुमिका घेऊन धर्माच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने जाहीर सभेतून वारंवार करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला वाधा येत असून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक ऐक्याला तडा जात आहे. राज्यात दोन धर्मात तेढ निर्माण होऊन सामाजिक वातावरण अतिशय तणावांचे वनत आहे याची पोलीस प्रशासनाने व राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करावी ही विनंती. तसेच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर कडक शिक्षा व्हावी व त्याच्या पाठीशी सुत्रधार कोण आहेत हे तात्काळ शोधणे आवश्यक आहे. कृपया आमच्या या तक्रारीची दखल घेऊन दोषींवर त्वरीत कारवाई करावी व राज्यात कायदा सुव्यवस्था अवाधित राखावी ही विनंती, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow