एक दिवस असा येईल की 15 ऑगस्टला भगवा फडकवला जाईल:शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे विधान
एक दिवस असा उजाडेल की भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्तान जगात जन्माला येईल,असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले होते. संभाजी भिडे म्हणाले की, मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कन्याकुमारी ते काश्मीर एकसंघ होऊन, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, फ्रेंच, पोर्तुगीज यांना रणांगणात पराभूत करून 1784 ते 1803 हे 19 वर्षे लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवून या देशावर या देशावर हिंदवी स्वराज्याचे राज्य चालवले. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. चंद्रहार पाटील, उदय सामंत, एकनाथ शिंदे एकवटले आहेत. त्यांना नक्की यश मिळेल. सूर्य पुन्हा उगवेल आणि संपूर्ण देशात भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा होईल. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी सर्वधर्म समभावाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान केले आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष. हा निव्वळ नपुंसक पणा आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सतत काम करण्याचाही संकल्प व्यक्त केला. लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार संभाजी भिडे यांनी यांनी यावेळी लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा संकल्प व्यक्त केला. आपण स्वातंत्र्या वेळी तिरंगा झेडा स्वीकारला. तिरंगा व संविधान आपण मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. त्यामुळे देव, देश व धर्मासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. आम्ही 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी ही काम करत राहू, असे ते म्हणाले. खग्रास ग्रहणाच्या काळात मंत्रजाप केल्याने शक्ती मिळते संभाजी भिडे पुढे म्हणाले, खग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्याने एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गायत्री मंत्राचा जप केला होता. ते काही तास मानेपर्यंत थमंड पाण्यात बसून होते. 3 एप्रिल रोजी त्यांना ताप असह्य झाला. त्यांना तोंडावाटे पाणी दिलेले पाणी शरीराबाहेर पडत होते. शरीर पूर्णपणे खचले होते. तेव्हा ते आपल्या जवळ असणाऱ्यांना म्हणाले होते, आम्ही जातो, आमचा काळ झाला. सप्तसिंधू सप्त गंगा मुक्त करा. हे त्यांचे अखेरचे शब्द होते. सोयराबाई यांना जे हवे होते ते शक्य नव्हते. छत्रपती संभाजी महाराज राजे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्यानंतर राजे झालेच. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यात साम्य काय, तर संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तीमत्व होते. पण संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस निघाला. त्याने वतनासाठी शेण खाल्ले.

What's Your Reaction?






