दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘पे अँड पार्किंग’चे भिजत घोंगडे, मनपाचे आर्थिक वर्षात पाच महिन्यांपासून टेंडरच नाही‎

शहरातील ‘पे अँड पार्किंग’च्या जागांचा २०२४-२५ या आर्थिक वर्षात केलेला करार ३१ मार्चला संपून ५ महिने झाले तरी नवीन करार करण्यासाठी अद्याप महापालिकेने निविदा प्रक्रियाच राबवली नाही. त्यामुळे या पार्किंगच्या जागांवर मध्यंतरी हातगाडीवाले कापड, फळे, किरकोळ वस्तू विक्रेत्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहन पार्किंग करावे तरी कुठे? असा प्रश्न अकोलेकरांना पडला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून गांधीरोडसह बाजारपेठेतील हातगाडीवाले, किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण काढल्याने आता पार्किंगच्या जागा मोकळ्या झाल्या आहेत. नागरिक या जागांवर आपली वाहने पार्किंग करत आहेत. मात्र ती अधिकृत नसल्याने त्यांच्या वाहनांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. महापालिकेच्या अकोला शहरात विविध आठ ठिकाणी पार्किंगच्या जागा आहेत. गेल्या वर्षी या आठ ठिकाणी ‘पे अँड पार्किंग’ची निविदा काढून त्याचे कंत्राट दिले होते. त्या कंत्राटाच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२५ला संपली. त्यानंतर या पार्किंग साठीच्या १० जागेसाठी नवीन निविदा काढण्यात आली. आठ जागांसाठी निविदा प्राप्त दहापैकी आठ जागांच्या निविदा नियमानुसार प्राप्त झाल्या तर फतेह चौकातील जागेसाठी एकही निविदा प्राप्त झाली नाही तर नेहरु पार्कच्या भिंतीलगतच्या जागेसाठी एकच निविदा प्राप्त झाली. या पार्किंगचे कंत्राट देण्यासाठीच्या आठ जागांच्या निविदेची फाइल तब्बल चार महिने नगर रचना विभागात रखडली आहे. महापालिकेला अपेक्षित पेक्षा कमी दराच्या आल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पे अँड पार्किंगच्या जागा {गांधी चौक, दुर्गादेवी मंदिरासमोरील जागा {कवच संकुलामागील रस्त्यावरील भाग {महापालिका आवाराच्या भिंतीसमोर {खुले नाट्यगृह आवाराच्या भिंतीला लागून {जि.प. कार्यालयाचे पूर्वेकडील भिंतीला लागून आयडीबीआय बँकेसमोर {खंडेलवाल ज्वेलर्सच्या बाजुला मनपा हिंदी शाळा क्रमांक २ ला लागून {अकोला जनता बँकेच्या बाजूला {मीरा हॉटेल समोरील खुली जागा मनपाचे लाखोंचे नुकसान शहरातील शहरातील ‘पे अँड पार्किंग’च्या जागांची नव्याने निविदा काढून कंत्राट देण्याचे काम या नवीन वर्षांत पाच महिने झाले तरी अद्याप मार्गी न लागल्याने या पार्किंगच्या कंत्राटापोटी मनपाला मिळणारा लाखोंचा महसूल बुडाला आहे. तसेच या जागेवर आतापर्यंत हॉकर्स व इतर विक्रेत्यांनी लावलेल्या हातगाडयांमुळे वाहतुकीच्या कोंडीचाही नागरिकांना करावा लागला. याला जबाबदार कोण?, असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow