महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या परीक्षेचे पेपर फुटले:खासगी युट्युब चॅनेलवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरे प्रसारित केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता ३री ते ९वीच्या परीक्षेचे पेपर आणि त्यांची उत्तरे खासगी युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात 'कैलासन सर मॅथ्स', 'म मराठी' आणि 'एस.जे. ट्युशन क्लासेस' या तीन खासगी युट्युब चॅनेलची नावे समोर आली आहेत. या चॅनेलवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता परीक्षेचे पेपर प्रसारित करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहायक संचालक संगिता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता निदर्शनास आला. तक्रारदार संगिता शिंदे यांच्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता ३री ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पायाभूत चाचणी घेण्यात येते. यावर्षी ही चाचणी ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. परिषदेने १७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान खाजगी कार्गो कंपनीमार्फत परीक्षेचे पेपर पाठवले होते. ६ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता युट्युब चॅनेलवर सातवीचे मराठीचे पेपर, ५ ऑगस्टला झालेला आणि ७ ऑगस्टला होणाऱ्या सातवी-आठवीच्या गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत आधिनियमाच्या विविध कलमांन्वये तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७२, २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow