गुरू ईश्वरानंद महास्वामींच्या समाधी स्थळास अभिवादन‎:चंद्रकांत पाटील आमदार, नेत्यांच्या घरी, भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी

प्रतिनिधी | सोलापूर सोलापूर दौऱ्यावर आलेले उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सकाळी आमदार सुभाष देशमुख यांचे निवासस्थानी भेट घेतली. दुपारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या घरी गेले. सायंकाळी नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या घरी जाऊन चहा घेत सत्कार स्विकारला. भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या दौऱ्यात भाजपा आमदाराकडे जाऊन चहापान केला. वारंवार नेते भाजपा आमदारांकडे जात असल्याने भाजपात स्थानिक नेते नाराज असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान परगावी असलेले आमदार विजयकुमार देशमुख यांनाही ना. पाटील यांनी फोन केल्याचे सांगण्यात आले. सोलापुरातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नाही. बाजार समिती निवडणुकीत आमदारांमध्ये पडलेली फूट आणि त्यात शहरध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची अनपेक्षीत निवड यामुळे भाजपात अस्वस्थता आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांनी साधलेली जवळीकता पाहता भाजपात नाराजी असल्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले ना. पाटील सकाळी होटगी रोडवरील आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी गेले. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरु ईश्वरानंद महास्वामी हे लिंगैक्य झाल्याने त्यांना समाधी स्थळास चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले. त्यासाठी शनिवारी चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. नई जिंदगी येथील मठात जाऊन समाधी स्थळास अभिवादन केले. आ. देशमुख, त्यांचे चिरंजीव रोहन व मनिष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मुरारजी पेठेतील राधानिवास येथे गेले. त्यानंतर सायंकाळी मजरेवाडी येथील शहरध्यक्ष तडवळकर यांच्या घरी जाऊन चहा घेतला. तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही देशमुख नाराज असल्याची चर्चा मार्केट कमिटी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुभाष देशमुख तर शहराध्यक्ष निवड वरुन आमदार विजय देशमुख हे नाराज असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. याबाबत दोन्ही देशमुखाकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

Jun 2, 2025 - 03:43
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow