राज्यात आज 65 नव्या कोरोनाबाधितांची नोंद:सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले, सक्रिय रुग्णसंख्या 506 वर; आतापर्यंत 8 मृत्यू
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसतो आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 65 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे (25), मुंबई (22), ठाणे (9) आणि पिंपरी-चिंचवड (6) या भागांमध्ये आढळले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून कोविडमुळे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 11 हजार 501 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 814 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील 300 हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र सध्या 506 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात यावर्षी कोरोनामुळे 8 मृत्यू जानेवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड-19 मुळे एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सात रुग्णांच्या मृत्यूचे कारण त्यांना आधीपासून असलेल्या गंभीर आरोग्य समस्या होत्या. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या रुग्णाला हायपोकॅल्सेमिक झटके (हायपोकॅल्सेमिया) आणि नेफ्रोटिक सिंड्रोमचा त्रास होता. दुसरा रुग्ण कर्करोगाने ग्रस्त होता. तिसऱ्या रुग्णाला स्ट्रोक (सेरेब्रोव्हस्कुलर रोग) झाला होता आणि त्याला झटके येत होते. चौथ्या रुग्णाला डायबेटिक केटोअॅसिडोसिस (DKA) आणि लोअर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (LRTI) होते. पाचव्या रुग्णाला इंटरस्टिशियल फुफ्फुसांचा आजार (ILD) होता. सहावा रुग्ण मधुमेहाने ग्रस्त होता आणि 2014 पासून तो अर्धांगवायूने ग्रस्त होता. सातवा रुग्ण गंभीर तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (एआरडीएस) आणि डायलेटेड ऑर्टिक रिगर्जिटेशनने ग्रस्त होता. आठवा रुग्ण 47 वर्षीय महिला होती जिला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार होती. देशभरातही रुग्णांमध्ये वाढ दरम्यान, देशातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. रविवारी सकाळपर्यंत, भारतात कोरोना रुग्णांची सध्याची संख्या 3 हजार 395 होती. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे केरळमधून येत आहेत. रविवारी सकाळपर्यंत केरळमध्ये 1 हजार 336 सक्रिय रुग्ण होते. आरोग्य विभाग अलर्टवर देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच, महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील अलर्ट मोडवर आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाध व यांनी परिस्थितीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. कोणत्याही संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा... अपेंडिक्स शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची त्वचा भाजली:वाशीम जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना, नातेवाईकांची पोलिसांत तक्रार राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना वाशीम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयात अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही दुर्घटना घडून गेल्यानंतरही डॉक्टरांकडून नातेवाईकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा...

What's Your Reaction?






