अहिल्यादेवींचे चरित्र, कार्य, जीवनातील संघर्षगाथा ओव्यांच्या माध्यमातून कथन:मंगळवेढ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयाेजन‎

सुंभरान मांडील, कैलासच्या शिवाला, शिवा पार्वतीला, आदी नमो गणाला अशी सुरुवात करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरजीवन चरित्र त्यांच्या कार्याचा त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, जीवनातील संघर्ष व त्यांचा जीवनपट हा धनगरी ओव्यांच्या माध्यमातून ओविकारांनी शुक्रवारी सकाळी कथन केला. या "धनगरी ओव्यांच्या" कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अप्पासाहेब चोपडे होते. या वेळी धर्मगावचे सरपंच राहुल सलगर, हणमंत मासाळ उपस्थित होते. धनगरी ओव्याच्या कार्यक्रमात दिवसभरात १० संघांनी आपला सहभाग नोंदवला. ढोल वाजवून गोड आवाजात सादरीकरण केले.सायंकाळी ७.०० वाजता नाद भारूडाचा हा कार्यक्रम "भारूड सम्राट दादा मेटकरी व सहकारी, फटेवाडी यांनी सादर केला. या भारूडाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुशील आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात १३८ जणांनी केले उत्स्फूर्त रक्तदान शुक्रवारी सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन अस्थिरोगतज्ञ डॉ. नितीन चौंडे, डॉ. सचिन बेलदार, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी डॉ. सुरेश होनमाने, दुय्यम निबंधक विकास रावळ उपस्थित होते. या शिबिरात १३८ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना पाण्याचा जार, दुधाची किटली भेट म्हणून देण्यात आली. रक्त संकलन अक्षय ब्लड बँक यांनी केले. शिबिरासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दामाजी मेटकरी ,अजय सरक आदींनी परिश्रम घेतले.

Jun 1, 2025 - 03:02
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow