काँग्रेस भवनमध्ये अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन:जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
प्रतिनिधी | अमरावती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन अमरावती येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित वर्गाला आवाज दिला. त्यांच्या कार्यातून आजही प्रेरणा घ्यावी लागते, अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे भाषण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेसाठी खूप प्रसिद्ध आहे. ते एक थोर भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते होते. त्यांनी केसरी नावाचे मराठी वृत्तपत्र सुरू केले, ज्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र आणले. त्यांचे भाषणे नेहमीच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत. असेही देशमुख म्हणाले. तत्पूर्वी या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे आणि टिळक यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हरिभाऊ मोहोड, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, प्रदीप देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, भैय्यासाहेब मेटकर, समाधान दहातोंडे, नंदू यादव, बिट्टू मंगरुळे, सिद्धार्थ बोबडे, शेखर दाभणे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?






