भारत विकास परिषदेच्या शालेय राष्ट्रगान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद:११ शाळांनी घेतला सहभाग, विद्यार्थ्यांनी जिंकली मने
प्रतिनिधी |अकोला राष्ट्रीय सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या भारत विकास परिषदेच्या शाखेच्या वतीने आयोजित शालेय राष्ट्रीय सामूहिक गान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंगीलाल बाजोरिया विद्यालय सभागृहात शनिवारी झालेल्या या स्पर्धेत ११ शाळा सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भूषण काले उपस्थित होते. मंचावर भारत विकास परिषदचे प्रांतीय उपाध्यक्ष नवीन कृपलानी, परिषदेचे अकोला अध्यक्ष मुकेश मेर,सचिव ओमप्रकाश जसवानी, कोषाध्यक्ष किंजल देढिया, परीक्षक संगीत तज्ज्ञ प्रदीप शर्मा, धनंजय देशमुख व पद्माकर मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचा प्रारंभ भारत माता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने केला. अॅड. काले यांनी मनोगतात या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करून विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन केले. प्रास्ताविक परिषदचे अध्यक्ष मुकेश मेर यांनी करून भारत विकास परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या स्पर्धेत स्वावलंबी विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, प्रभात किड्स, पोदार इंटरनॅशनल स्कूल, समर्थ पब्लिक स्कूल रिधोरा, खंडेलवाल इंग्लिश विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, स्कूल ऑफ स्कॉलर्स, खंडेलवाल ज्ञान मंदिर, आरडीजी पब्लिक स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय आदी शाळा सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेत सहभागी सर्व शाळांना विशेष मोमेंटो तथा प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. स्पर्धेचे सफल परीक्षण संगीत तज्ज्ञ प्रदीप शर्मा, धनंजय देशमुख व पद्माकर मोरे यांनी केले. संयोजन आशिष चौथे, विवेक शुक्ल व कीर्ति पंजवानी यांनी केले. संचालन सुषमा मार्के यांनी केले तर आभार सचिव ओमप्रकाश जसवानी यांनी मानले.यावेळी विक्रम परमार, विशाल तडस, मयूर गणोरकर, उज्ज्वल सिंह राजपूत, रवि चोपडे, अनंत ताथुरकर समवेत शिक्षक, विद्यार्थी व पालकगण उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रभात किड्स ने प्राप्त केला. प्रभातच्या चमुस यावेळी ५ हजार १०० रुपये व ट्रॉफी नमस्ते फिन्टेक्सच्या सहकार्याने देण्यात आली. द्वितीय पुरस्कार समर्थ पब्लिक स्कूल, रिधोराला मिळाला, त्यांना गुरुकृपा सुपर मार्केटच्या वतीने ३१०० रुपये नगद प्रदान करण्यात आले. तृतीय पुरस्कार हा आरडीजी पब्लिक स्कुलला मिळाला. त्यांना प्लाई बाजारच्या वतीने २१०० रुपये प्रदान करून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

What's Your Reaction?






