शालेय जीवनातच मिळते नेतृत्व जबाबदारी स्वीकारण्याची संधी:अभिनव पब्लिक स्कूलमध्ये शासनाचे जलसंवर्धन अधिकारी प्रसाद नवले यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी | अकोले विद्यार्थी परिषद नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ सोहळ्यातून शालेय जीवनातच नेतृत्व करण्याची व जबाबदारी स्वीकारण्याची संधी विद्यार्थांना मिळते. नवनिर्वाचित उमेदवारांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पडावी. जिद्द ,मेहनत, चिकाटी व योग्य मार्गदर्शनातून मी अधिकारी बनू शकलो. शैक्षणिक व संस्कारांची मूल्य याच शाळेने माझ्यात रुजवली, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी व राज्य शासनाचे जलसंवर्धन अधिकारी प्रसाद नवले यांनी केले. येथील अभिनव शिक्षण संकुलातील मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजात विद्यार्थी परिषदेतील नवनिर्वाचित उमेदवारांचा शानदार शपथविधी व पदग्रहण समारंभ सोहळा अभिनवच्या क्रीडांगणावर उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जलसंवर्धन अधिकारी नवले, प्राचार्या अल्फोन्सा देवाशीश, विभागप्रमुख स्मिता पुंड, पर्यवेक्षक पराग सानप, समुपदेशक आरती जाधव यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांत हेड बॉय पदावर पवन चौधरी, हेड गर्ल पदावर अदिती गजे, येल्लो यॉन्कर्स हाऊस लीडर म्हणून धनंजय देशमुख, गौरी नवले, तन्वी गायकवाड, आर्यन चासकर, रेड रेंजर्स हाऊस लीडर म्हणून प्रणित गोरडे, खुशी सिंग, आर्यन भोपे, श्रेया आवारी, ग्रीन ग्लॅडिएटर्स हाऊस लीडर म्हणून अनिकेत पवार, पूर्वी वावळे, साईराज शेळके, पूर्वा हासे, ऑरेंज ऑर्गनायझर्स हाऊस लीडर म्हणून ओंकार मंडलिक, श्रावणी नवले, श्लोक वाळुंज, कार्तिकी शेणकर तसेच जुनिअर कॉलेजचे रितेश काळे, जाधव संकष्टी या सर्वांनी पदभार स्वीकारले. या पदाधिकाऱ्यांना आपण वर्षभर आपल्या कार्याप्रती निष्ठा राखून कार्यरत राहू अशी शपथ देण्यात आली. अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, खजिनदार विक्रम नवले यांनी अभिनव मधील नवनिर्वाचित पदाधिकारी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मंडलिक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक आदिनाथ आभाळे, सागर साळुंखे, अश्विनी फापाळे, संगीता वाळुंज, नृत्य शिक्षिका काव्य कदम, कलाशिक्षक संतोष घोडेकर, सुमन धिंदळे, संगीत शिक्षक राम आहेर व उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार रोहिणी दिघे यांनी मानले.

Aug 4, 2025 - 12:24
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow