सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात:संजय राऊतांचा दावा, म्हणाले - सध्या कामाच्या पद्धती पाहता काहीही होऊ शकते

सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतींना ते भेटायला बोलावत नाहीत, ही बातमी आहे. या देशात सध्याच्या कामाच्या पद्धती पाहता काहीही होऊ शकते. काय होते ते पाहू, असे संजय राऊत म्हणाले. दिल्लीत संसदीय पावसाळी अधिवेशन सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत असून, या भेटीवर संजय राऊत यांनी उपरोक्त दावा केला आहे. नेमके काय म्हणाले संजय राऊत? संजय राऊत म्हणाले की, सध्या आपल्या देशात राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत? हे आपल्याला माहित आहे. राष्ट्रपतींच्या सल्ल्याने सरकार किती काम करते हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत सुद्धा महत्त्वाच्या भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जे सातत्याने सांगितले जात आहे की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. आ ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची बैठक आहे. राहुल गांधी या बैठकीचे निमंत्रक आहेत. राहुल गांधी यांनी स्वत: सर्वांना फोन करून निमंत्रण दिले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. ते ६ ऑगस्ट रोजी दिल्लीत दाखल होतील आणि ८ ऑगस्टपर्यंत दिल्लीत थांबतील. या तीन दिवसांत ते बैठकीत सहभागी होतील, तसेच सर्वांची भेट घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही संपून जातील, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्त्व देत आहात. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात एक माणूस बोलतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकप्रकारे त्यांचे एकप्रकारे समर्थन करत आहेत. या प्रवृत्तीला दिल्लीतील लोकांनी खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे. ते हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नाहीत. तुम्ही घाम गाळायला आलात, म्हणजे पैसे कमवायला,मुंबई ओरबाडायला आला आहात. तुमच्या राज्यात नोकऱ्या, उद्योगधंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आला आहात. इकडचा पैसे तुम्ही तुमच्या राज्यातच घेऊन जात आहात, हे दुबेला कळायला पाहिजे. मराठी माणसाचे पोट मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात. भव्य मुंबई निर्माण करण्यासाठी इथे आले नाहीत, असा घणाघात संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांच्यावर केला आहे. नेहरूंचा द्वेष करणारे राज्य करायच्या लायक नाहीत नितीन गडकरी किंवा अन्य कुणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचे नाव घेऊन देशातील जडणघडतील योगदानाविषयी काही बोलले असतील, तर त्यात चुकीचे काय? भाजप आणि सरकारमध्ये सध्या नितीन गडकरी समजदार मंत्री आहेत. नेहरूंचे नाव घेतल्यामुळे नितीन गडकरींवर कारवाई तर होणार नाही ना? अशी शंका मला येते. मुंबईमध्ये एका मेट्रो रेल्वे स्टेशन नाव देताना नेहरू नाव काढले आणि विज्ञान केंद्र नाव दिले आहे. मुळात ते नेहरू विज्ञान केंद्र आहे. एवढा द्वेष कुणाच्या पोटात असेल, तर ते या देशावर राज्य करायला लायक नाहीत. नितीन गडकरींच्या समजदारीला सलाम बोरवलीच्या मेट्रो स्टेशनमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. पण मेट्रो स्टेशनला नाव देताना राष्ट्रीय उद्यान म्हटले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटले नाही. इतके द्वेषपूर्ण पद्धतीने काम करणारे राज्यकर्ते या देशाला लाभले, हे दुर्दैव आहे. नेहरूंनी तुमचे काय बिघडवले? तुम्ही त्यांचेच खाताय ना? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. नितीन गडकरींनी नेहरू-गांधींचे योगदान मान्य केले असेल, तर मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या समजदारीला सलाम करतो, असेही राऊत म्हणालेत. दहशतवादाला कोणता रंग नसतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातनी दहशतवाद असल्याचे म्हटले आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, दहशतवाद हा दहशतवाद असतो. तो हिरवा, भगवा, लाल नसतो. ही चुकीची धारणा आहे. काही लोक दहशतवादाला आपल्या हिशोबाने राजकीय रंग देत असतात. लोक दहशतवादी का बनत आहेत? त्यांना रोजगार, शिक्षण नाहीये यामुळेच नक्षलवाद वाढल्याचे संजय राऊत म्हणाले.

Aug 4, 2025 - 12:24
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow