महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सोनाबाई चौधरी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
प्रतिनिधी | पारनेर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) दक्षिण अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी सोनाबाई चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चौधरी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. आमदार काशिनाथ दाते आमदार संग्राम जगताप,पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर,जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, संध्या सोनवणे, अपर्णा खामकर उपस्थित होते. सोनाबाई चौधरी यांनी वडझिरे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषवले आहे. तळागाळातील महिलांचे,बचत गटांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच महिलांचे संघटन करून राष्ट्रवादीचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, सुमनताई दाते, सिल्लया नाईक- नरसाळे, सुचिता वाघमारे, विद्या खामकर, सांगिता चेडे,उमाताई बोरूडे, सुजाता गाजरे, नंदिनी बेलोटे आदींनी चौधरी यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोनाबाई चौधरी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

What's Your Reaction?






