गुलिस्तान नगर, महावीर कॉम्‍प्‍लेक्‍स, मोरबागात 600 किलो प्लास्टिक जप्त:प्लास्टिक विकताना आढळल्यास यापुढे कारवाईचा मनपा प्रशासनाचा इशारा‎

गुलिस्ताननगर, मोरबाग, महावीर कॉम्‍प्‍लेक्‍स परिसरात सोमवार ४ रोजी मनपा पथकाने ६०० किलो प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई केली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारवाई दरम्यान अब्‍दुल सलाम अब्‍दुल सत्‍तार रा.गुलिस्‍तानगर यांच्‍याकडे एकूण १५ पोते अंदाजित ५० किलो, पवन कुकरेजा महावीर मार्केट यांच्‍याकडे एकूण १९ पोते अंदाजित ३०० किलो, रतन खत्री मोरबाग यांच्‍याकडे एकूण ३२ पोते अंदाजित २५० किलो प्लास्टिक साहित्य आढळून आले. सर्व प्लास्टिक साहित्य तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा व प्लास्टिक बंदीचे काटेकोर पालन करावे. नियम भंग करणाऱ्यांवर भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा प्रशासनाने दिला आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंद्रे, पोलीस विभागाचे अधिकारी संयोनी इमरान नायकवडे, पर्यावरण विभागाचे अधिकारी जितेंद्र पुंडसे, मध्‍य झोन क्र.२ चे सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्‍त दिपक खडेकार, उदय चव्‍हाण, अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, अग्निशमन विभागाचे अधिकारी संतोष केंद्रे, नोडल अधिकारी विकी जेधे, स्‍वास्‍थ निरीक्षक प्रशांत गावनेर, मनपा कर्मचारी उपस्थित होते. गेल्या महिनाभरात महानगर पालिकेद्वारे सातत्याने मोठया कारवाया केल्या जात असून झोन क्र. २ राजापेठ व झोन क्र. ५ भाजीबाजारमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. सुमारे २५०० किलोच्या वर बंदी असलेले प्लास्टिक आतापर्यंत जप्त करण्यात आले आहे. सातत्याने कारवायांचा धडाका मनपा क्षेत्रात महानगर पालिकेने बंदी असलेल्या ५५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकविरोधात जप्तीची मोहिम उघडली आहे. ही कारवाई दुकानदारांवर केली जात असून जे प्लास्टिक विक्रेते सायकल किंवा दुचाकी वाहनांवर फिरून हॉकर्सला पन्नी विकतात त्यांच्यावरही कारवाया होणे गरजेचे आहे. कारण, यांच्याकडून हॉकर्स दररोज प्लास्टिक पन्नी खरेदी करतात. त्यामुळे त्यांना अगदी सहज प्लास्टिक पन्नी मिळते. ही एकाचवेळी दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात पन्नी खरेदी करून स्वत:कडे ठेवतात, अशी माहिती प्लास्टिक बंदी विरोधात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी दिली असून त्यांनी मनपाने अशा विक्रेत्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow