कवडे, सोनवणे, लोखंडे, पटवर्धन बुद्धिबळाच्या पटावरचे ‘किंग':विवेक कोल्हे बुद्धिबळ चषक स्पर्धेचा समाराेप, विक्रमी 700 स्पर्धक‎

रणनीतींचे डावपेच, बुद्धिबळाच्या पटावर चालींची चढाओढ, चेस क्लॉकची धडधड, क्षणाक्षणाला पटावर पालटणारं चित्र, अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली निर्णायक लढाई हे सारं कोपरगावकरांना याचि देहि याचि डोळा अनुभवायला मिळालं. निमित्त होतं विवेक कोल्हे राज्यस्तर बुद्धिबळ चषक स्पर्धेचं. ४ गट आणि ९ फेऱ्यांत पार पडलेल्या स्पर्धेची सांगता झाली. ११ वर्ष वयोगटात निशांत कवडे, १४ वर्ष वयोगटात आर्यन सोनवणे, १९ वर्ष वयोगटात ओंकार लोखंडे आणि खुल्या गटात विशाल पटवर्धन (सोलापूर) यांनी बाजी मारली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. राज्यस्तरीय, आंतरजिल्हा, आंतरतालुका, मुलींसाठी विशेष प्रावीण्य अशी ६४ रोख आणि १३२ चषक स्वरुपातील पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर वैभव आढाव, हरिश्चंद्र कोते,ज्ञानेश्वर थोरे,अभिमन्यू पिंपळवाडकर, प्रा.डॉ.राजेश मंजूळ आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात बुद्धिबळाला चालना मिळण्याच्या हेतूने कोपरगाव चेस क्लब व संजीवनी युवा प्रतिष्ठाण यांच्या वतीनं बुद्धिबळ चषक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. स्पर्धेच्या आयोजनाचं यंदा चौथ वर्ष होतं. राज्यभरातील विविध गटातील ७०० हून अधिक स्पर्धकांनी उच्चांकी प्रतिसाद नोंदविला. फिडे नामांकित पंच सागर गांधी यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, वैभव सोमसे, विशाल पंडोरे. लक्ष्मण सताळे, प्रीतम डागा, राजेंद्र कोहकडे, रमेश येवले, शिवप्रसाद घोडके, नितेश बंब, गणेश कोळपकर, चैतन्य भावसार,अथर्व थोरात, साक्षी गाडे, वरद जोशी, राजेंद्र कोळपकर, नितीन जोरी, चेतन चौधरी आदी प्रयत्नशील होते.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow