यंदा रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त दुपारी 1.24 पूर्वी:रक्षाबंधन शनिवारी होणार साजरे; पुरोहित संघाच्या सभेत ठरवला मुहूर्त‎

भावाबहिणीचे नाते घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. भावाबहिणींसाठी हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनाची ओढ असते. बहिणी तर या सणाची विशेष वाट पाहतात. हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट दुपारपासून सुरू होईल. रक्षाबंधन ८ तारखेला साजरे होणार की ९ तारखेला या संभ्रमात अनेकजण आहेत. तर यंदा शनिवार ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करण्यात येणार असून शुभमुहूर्त दुपारी १.२४ पूर्वी आहे. अकोला पुरोहित संघाची सभा सिटी कोतवाली जवळ श्री बालाजी मंदिरात घेण्यात आली. यावेळी सिंधू ग्रंथांचा आधार घेऊन रक्षाबंधनाचे मुहूर्त ठरवण्यात आले. नारळी पौर्णिमा तिथी प्रारंभ ८ ऑगस्ट दुपारी २ वाजून १२ मिनिटांपासून पौर्णिमा तिथी समाप्ती ९ ऑगस्ट दुपारी १ वाजून २१ मिनिटांपर्यंत आहे. उदय तिथीनुसार ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे. यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्राकाळ असणार नाही. त्यामुळे निश्चित होऊन राखी बांधावी. भद्राकाळात राखी न बांधण्याचे कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने त्याला याच भद्रकाळात राखी बांधल्याने त्याचा विनाश कसा झाला, असे म्हटले जाते. त्यामुळे भावाच्या सुखी व उदंड आयुष्यासाठी भद्रकाळात राखी बांधली जात नाही. रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असतो तसेच राखी देखील विशिष्ठ काळाने काढली जावी असे मानतात. रक्षाबंधनाच्या २४ तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते. तसेच अनेकजण गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील राखी काढतात. तर अनेकजण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून राखी आपोआप हातातून निघत नाही तोपर्यंत ती बांधून ठेवतात, रक्षाबंधन शुभमुहूर्त रक्षाबंधन मुहूर्त सकाळी ५:४७ वाजता सुरू होऊन दुपारी १:२४ पर्यंत असेल, ७ तास १० मिनिटांचा मुहूर्त आहे. सकाळी ७.३७ पासून ९.१४ पर्यंत शुभ मुहूर्त आहे. चंचल दुपारी १२.२७ पासून १.२४ पर्यंत, अभिजीत दुपारी १२.३ पासून १२.५१ पर्यंत रक्षाबंधन संपन्न करू शकता. पौर्णिमा तिथी दुपारी १.२४ पर्यंत राहील. लोकपरंपरेनुसार कुल प्रथेनुसार दुपारी १.२४ नंतरही राखी बांधू शकता. सभेत पं. रतन तिवारी, भैरव शर्मा, सुमित तिवारी, लाला तिवारी, रजनीकांत जाडा, श्याम अवस्थी, प्रमोद तिवारी व पं. रवी कुमार शर्मा उपस्थित होते.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow