सोशल मीडियावर खोट्या गोष्टी पसरल्याने समाज वेगळ्या मार्गाला:पतितपावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.एस. झेड. देशमुख यांचे प्रतिपादन‎

अकोले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व ते प्यायलेला डरकाळी फोडेल, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. आज मोबाइलमुळे जनसंपर्क वाढला, पण बोलणे कमी झाले. सोशल मीडियावर अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या जातात व त्या पटतात, यामुळेच समाज वेगळ्या मार्गाने जातो आहे. यासाठी वाचन वाढवणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी, संतश्रेष्ठ तुकारामांची गाथा, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत पाकिस्तान फाळणी ही चार पुस्तक असणे गरजेचेच आहे. ही पुस्तके समाजात नीतिमूल्य टिकवू शकतात. ही पुस्तके जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाहीत व हे वाचन कमी झालं तर समाजात मोठी दरी निर्माण होईल, अशी भीती पतितपावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व चार्टर्ड अकौंटट प्रा. एस. झेड. देशमुख यांनी व्यक्त केली. श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शांताराम काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी योगी केशव बाबा चौधरी होते. व्यासपीठावर सुरेश कोते, वकील अनिल आरोटे, संस्थेचे विश्वस्त प्रकाश टाकळकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रजिस्ट्रार संतोष साबळे, मुख्याध्यापिका मंजूषा काळे, श्रीनिवास वाणी, संतोष बनसोडे, सचिन देशमुख आदी उपस्थित होते देशमुख म्हणाले, संतमहात्म्य, देशभक्त व समाजसुधारकांनी खूप महान कार्य केले व आपल्याला खूप काही दिलेय, पण त्यांचा उपयोग आपण करत नाही. आपण त्यांच्याकडून काय घेतलं हे महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, पण त्यांचे विचार आज मागे पडत आहेत. समाजात गोंधळाची बजबुरी सुरू आहे. आज दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून आईबापाला मारणारे मुले निर्माण झाली. आजचे राज्यकर्ते खोऱ्याने पैसा ओढणारे आहेत, याचे वाईट वाटते. कृष्ण, रामाची मंदिरे बांधली पण त्यांचे आदर्श व सद्गुण आपण घेतले नाहीत. आम्ही आज श्रीराम, ज्ञानेश्वर, तुकाराम, श्रीकृष्ण व सद्गुरूंना विसरलोय, याचे वाईट वाटते. या देशात स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, श्रीराम, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर असे युगपुरुष निर्माण झाले हे महत्त्वाचे असून त्यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये खोलवर रुजवणे गरजेचे आहे. यावेळ सुरेश कोते, प्रा.मच्छिंद्र देशमुख, योगी केशव बाबा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समता फाउंडेशन व संगमनेर रोटरी क्लब यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी, उपचार व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले. त्यात ११० रुग्णांची तपासणी झाली. पैकी १५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपचार करण्यात येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने "शिक्षणाचा नवा मार्ग मिशन प्रवेश" व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम केले. १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंतांचे सत्कार केले. सत्कारमूर्ती शांताराम काळे यांचा सत्कार करण्यात आला. राजूर येथील कार्यक्रमात बोलताना प्रा. एस. झेड. देशमुख. शिक्षण गंगा कधी गटारगंगा झाली, हे समजलेच नाही रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा काढून ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली. सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक सचिव रा. वी. पाटणकर यांसारखे व्यक्तिमत्त्व राजूर याठिकाणी आले. त्यांनी आदिवासींना योग्य मार्ग दाखवण्यास ज्ञानदान सुरू केले. त्यांनी तेव्हा हे काम केले नसते तर आज आदिवासींमधील बहुसंख्य लोक शिक्षण घेऊ शकले नसते, असे देशमुख म्हणाले.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow