वडनेर महाविद्यालयात थॅलेसेमिया जनजागृती
वडनेर भैरव येथील मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्राणिशास्त्र विभागामार्फत थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. प्रकाश पंगम यांनी थॅलेसेमिया आजार, संतुलित आहार, चहाचे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांमधील आयर्नच्या कमतरतेची कारणे यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले. थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. महेश वाघ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आश्रय या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टचे सचिव प्रा. प्रकाश पंगम यांनी आपल्या भाषणात थॅलेसेमिया आणि ॲनिमियाचा प्रसार, वैद्यकीय वर्गीकरण, जोखीम, लक्षणे, निदान, गर्भावस्थेतील तपासणी, जन्मानंतरची तपासणी, उपचार पद्धती, प्रतिबंध आणि आहाराच्या शिफारशीवर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. थॅलेसेमिया असलेल्या महिलांना निरोगी गर्भधारणा शक्य आहे का, याबाबतही त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुदाम राठोड यांनी थॅलेसेमिया रुग्णांचे अनुभव आणि संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. अनिता सोनवणे यांनी प्रास्ताविकात थॅलेसेमिया आणि कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. या कार्यक्रमाला डॉ. रवींद्र कुलकर्णी, आयक्यूएसी समन्वयक प्रा. प्रकाश लांडगे, परीक्षा विभागप्रमुख प्रा. अनिल बचाटे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. शिवाजी चव्हाण व इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी कोल्हे यांनी तर आभार प्रा. माधुरी टोपे यांनी केले.

What's Your Reaction?






