शेतीत ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन उत्पन्न वाढवा- घुले:दहिगाव-ने येथे पीएम किसान सन्मान निधी हस्तांतरण कार्यक्रम
प्रतिनिधी | शेवगाव शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, शेतीमध्ये ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीज घुले यांनी केले. श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे शनिवारी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २० वा हप्ता हस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील ४१ हजार ९०१ शेतकऱ्यांना ८ कोटी ३८ लाख रुपये पीएम किसान योजनेंतर्गत संबंधितांच्या खात्यावर वितरित करण्यात आले. याप्रसंगी शेवगाव तालुका कृषी अधिकारी अंकूश जोगदंड, पाथर्डी तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील पिकाबाबात व फळबागेबाबत केव्हीकेचे शास्त्रज्ञ माणिक लाखे व नंदकिशोर दहातोंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाला दहिगावनेचे सरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब मरकड, कारभारी नजन मच्छिंद्र पानकर, मंडल कृषि अधिकारी प्रशांत टेकाळे, व्ही. आर. घुले, तात्यासाहेब दिवटे, नंदकिशोर थोरे, अतुलकुमार बनकर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी, सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी, तर आभार इंजि. राहुल पाटील यांनी मानले. कृषी विज्ञान केंद्र दहिगावने येथेशेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना क्षीतिज घुले.

What's Your Reaction?






