महाराष्ट्राचा ‘राज्य खेळ’ म्हणून रम्मी जाहीर करा:सचिन सावंतांचा सरकारला टोला, शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा- अंबादास दानवे

कृषी खात्यातून दूर करत माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा विभाग सोपवल्या नंतर राज्य सरकारवर टीकेचा वर्षाव सुरु झाला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपरोधिक शैलीत सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. अंबादास दानवे यांनी कवितेच्या ओळींमधून कोकाटे यांच्या नव्या जबाबदारीवर आणि सरकारच्या धोरणांवर उपहासात्मक टीका केली. अंबादास दानवे यांचे ट्विट काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, विकूनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर, नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर…शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा,पदके नाही, 'रम्मी'कडूनच बक्षिसांची अपेक्षा…माफी मागा पुन्हा बरळा, हा फंडा चांगलाय,डर कशाला कोणाचा, बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय…वेडे-वाकडे बोलणे-वागणे टिकवी मंत्र्यांचा 'ताज',आता नको मैदान, रम्मी खेळायला बसा महाराज… असे म्हणत माणिकराव कोकाटे यांना दिलेल्या क्रीडा खात्यावरून टीका केली आहे. सचिन सावंतांचे ट्विट काय? दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही X वर पोस्ट करत म्हटलंय की, महाराष्ट्राचा अधिकृत राज्य खेळ म्हणून जंगली रमीला मान्यता मिळाली तर हरकत नको. नाहीतरी नवीन क्रीडा मंत्र्यांच्या तो आवडीचा खेळ आहे. दिवसातील बराच काळ ते याचा सराव करतात. तसेही राज्य सरकारकडे रोजगार निर्मितीकरता काही अजेंडा नाही. या माध्यमातून कमाई करण्यासाठी मंत्री स्वतः जनतेचे प्रशिक्षण वर्ग घेऊ शकतात. आणि जर पैसे गेले तर..तर आधी शेतकरी आत्महत्या होत होत्या, आता इतर करतील! नाही का? आता महाराष्ट्र जंगली रमीत थांबणार नाही...

Aug 2, 2025 - 06:26
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow