धार्मिक द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक अन् रोजगार धोक्यात:ट्रम्पच्या दबावाखाली रशियाशी व्यापार बंद; मोदी सरकार अपयशी– संजय राऊत

धार्मिक द्वेष निर्माण करत तणाव निर्माण करत निवडणुकीला सामोरे जायचे हे भाजपचे राष्ट्रीय धोरण ठरले आहे. कोणत्याही विषयाला धार्मिक रंग देत कुरापती काढायच्या, महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडति आहेत, याचा परिणात राज्यातील उद्योग, धंदा आणि रोजगार यावर होत आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहे की राज्यात गुंतवणूक वाढली आहे. पण अशा घटनामुळे वातावरण खराब होत असून रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, दौंड हा औद्योगिक पट्टा आहे, त्या भागामध्ये एमआयडीसी आहे, कारखाने, उद्योगसमुहासह बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे. जर अशा प्रकारच्या घडत राहिल्या तर त्यासाठी जबाबदार कोण आहे? पोलिस, मंत्री काय करत आहेत? राज्यात कुणाचे राज्य आहे, ही गोष्ट गंभीर आहे. बोगस वोटच्या सहाय्याने फडणवीस सरकार संजय राऊत पुढे म्हणाले की, वाकडे काम करत ही लोकं सत्तेत आले आहेत त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवता येणार नाही. सत्तेवर आलेली माणसं ही काही सरळ मार्गाने सत्तेवर आली नाहीत. राहुल गांधी जे सांगत आहे मतांची चोरी ते महाराष्ट्रातही झाले आहे, महाराष्ट्रात मतांची चोरी करत हे सरकार सत्तेवर आले आहे.फडणवीस सरकार ही बोगस वोटच्या माध्यमातून सत्तेत आलेले सरकार आहे. हेच हरियाणा मध्ये झाले आणि आता बिहारमध्ये करण्याचा प्रयत्न आहे, त्याविरोधात लढणाऱ्या राहुल गांधींसोबत आम्ही आहोत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. अन् आपण व्यवसाय बंद केला संजय राऊत पुढे म्हणाले की, मोदी सरकारने ट्रम्प यांना घाबरुन रशियाकडून तेल घेणं बंद केले आहे. भारत आणि रशियाचे जुने संबंध आहेत. रशिया आपले विश्वासू मित्र देश आहे. अमेरिकेच्या पूर्वीपासून आपण रशियासोबत व्यापार करत आलो आहोत. पण ट्रम्पने तिकडून इशारा दिला आणि इकडे सरकारने रशियासोबत व्यवहार करणे बंद केले आहे, हे अयोग्य आहे. आपला 140 कोटी लोकसंख्या असलेला देश असून ट्रम्प आपल्याला सांगू शकत नाही की आपण कुणाशी व्यापार करावा. कुणा-कडून तेल विकत घ्यावे आणि कुणा-कडून नाही हे आम्हाला ट्रम्प यांनी सांगण्याची गरज नाही. जगातील एकही देश आपल्यासोबत नाही संजय राऊत पुढे म्हणाले की, भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानांना ट्रम्प धमकी देत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात किती ताकद आहे हे यातून दिसून येत आहे. हे सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे. जगातील कोणताच देश आपल्यासोबत उभा राहिलेला नाही. ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे.

Aug 2, 2025 - 21:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow