भारत विद्यालयात मुलींचे समुपदेशन:माता पालक व मुलींच्या समस्यांवर नाटिकेद्वारे करण्यात आले मार्गदर्शन
न्हावी (ता.यावल) भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लेवा भातृ मंडळ, पिंपळे सौदागर पुणे यांच्यातर्फे कळ्या उमलतांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम माता पालक आणि विद्यार्थिनींसाठ आयोजीत केला. मुली तारुण्य अवस्थेत आल्यानंतर त्यांच्यात शारीरिक मानसिक व भावनिक बदल होतात हे त्यांनी नाटकाद्वारे समजून सांगितले. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींसाठी समतोल आहाराचे महत्त्व, व्यायामाचे महत्त्व त्यामध्ये सूर्यनमस्कार आणि योगाचे महत्त्व सांगितले. घरातील वातावरण हसत खेळत असले पाहिजे घरातील आई आणि मुलगी यांच्यामधील नातं मैत्री सारखं पाहिजे त्याचप्रमाणे आईने सुद्धा मुलीला शारीरिक बदलाबद्दल माहिती मनमोकळेपणाने सांगितली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले. विभावरी इंगळे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. दिलीप चौधरी, नरेंद्र नारखेडे, हर्षल जावळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन प्राचार्य डॉ.के.जी. पाटील, सचिव जयंत बेंडाळे, मुख्याध्यापक व्ही.बी. वारके, उपमुख्याध्यापिका संगीता फिरके उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन सुजाता बोंडे यांनी तर आभार शिक्षिका वंदना चौधरी यांनी मानले.

What's Your Reaction?






