नगरकरांची कोंडी:तारकपूरमधून गुलमोहर रस्ता, प्रोफेसर चौकात जाण्यासाठी 2 किमीचा वळसा, मिस्किन मळ्यात कामामुळे रस्ता बंद झाल्याने होतेय तारांबळ‎

सावेडी उपनगरातील प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या तारकपूर ते प्रोफेसर चौक, झोपडी कॅन्टीन व गुलमोहर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मिस्किन मळा, गंगा उद्यान येथे रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने सावेडी जॉगिंग ट्रॅक, तोफखाना पोलिस ठाण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. सिव्हिल हडकोतील पर्यायी रस्ताही काँक्रीटीकरण कामामुळे बंद असल्याने वाहनचालकांना दीड ते दोन किमीचा वळसा घालून मनमाड महामार्गावरून जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही सेंटर ते गंगा उद्यान रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे मिस्किन मळ्यातून टीव्ही सेंटरच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे वाहनचालक गंगा उद्यानमार्गे सावेडी जॉगिंग ट्रॅक व तेथून गुलमोहर रस्ता किंवा प्रोफेसर चौकाकडे जात होते. आता मंगळवारी दुपारपासून हा रस्ताही बंद केला. टीव्ही सेंटरपासून गंगा उद्यान व तेथून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तारकपूर येथून मिस्किन मळामार्गे गुलमोहर रस्ता, प्रोफेसर चौक व झोपडी कॅन्टीनकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा खोळंबा झाला आहे. तारकपूरवरून सिव्हिल हडकोमार्गे टीव्ही सेंटर, प्रोफेसर चौकाकडे जाणारा पर्यायी रस्ताही रस्त्याच्या कामामुळे बंद असल्याने चारचाकी वाहन चालकांना पर्यायी मार्ग शोधताना कसरत करावी लागत आहे. गंगा उद्यान परिसरातील रस्ता बंद करण्यात आला आहे. मिस्किन मळ्यातून जाणारा रस्ता रहदारीचा आहे. दिवसभर या रस्त्यावर मोठी वाहतूक असते. तारकपूर बसस्थानक, तेथील रुग्णालये व परिसरातील शाळांमध्ये मुलांना सोडण्यासाठी जाणारे वाहन चालक, स्कूल बस, व्हॅन चालकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिव्हिल हडकोतील पर्यायी रस्ता बंद असताना मिस्किन मळ्यातून जाणारा रस्ताही पूर्वसूचना न देता बंद केल्याने वाहन चालकांची गैरसोय झाली आहे. रस्त्याचे काम होईपर्यंत मिस्किन मळा रस्ता बंद ^शासनाच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. टीव्ही सेंटर ते गंगा उद्यान रस्त्याच्या भागाचे काम तांत्रिक अडचणीमुळे रखडले होते. त्यातून मार्ग काढून काम सुरू करण्यात आले आहे. काम पूर्ण होईपर्यंत मिस्किन मळ्यातून जाणारा रस्ता बंद राहील. सिव्हिल हडकोमधील बंद असलेला पर्यायी मार्ग दोन दिवसात खुला होईल. तोपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून मनमाड महामार्गाचा वापर नागरिकांनी करावा व महापालिकेस सहकार्य करावे. - मनोज पारखे, शहर अभियंता, मनपा

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow