भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी पुण्यात वाहतूक बदल:25 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक रात्री बंद राहणार

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी हुतात्मा चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. दररोज रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक बदल २५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावर भिडे वाडा स्मारक आहे. या स्मारकाचे काम सुरू करण्यात आले आहे. बांधकाम साहित्य वाहतूक करणारी वाहने, अवजड क्रेन कामानिमित्त ये-जा करणार आहेत. हे काम दररोज रात्री दहानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडगीळ पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. वाहतूक बदलाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकमार्गे बेलबाग चौक, स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी श्रीकृष्ण चित्रपटगृह रस्त्याने लक्ष्मी रस्त्यावर यावे. बेलबाग चौकातून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे नागरिकांना शिवाजीनगर बाजूने थेट मंडईच्या दिशेने जाण्यास पर्यायी मार्गाने जाण्यास वेळ लागणार आहे.

Aug 5, 2025 - 16:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow