सीमेवर गरुड नेत्र...:स्वखर्चाने ड्रोनविरोधी यंत्रणेची वाहने तैनात करणारे पंजाब देशातील पहिले राज्य
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पोलिस लाइन मैदान, तरणतारन येथे ड्रोनविरोधी यंत्रणेने सुसज्ज असलेल्या ३ वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. मान म्हणाले की, सीमावर्ती भागात शस्त्रास्त्रे आणि चित्त्यांची तस्करी रोखण्यासाठी स्वखर्चाने ३ ड्रोनविरोधी यंत्रणेने सुसज्ज वाहने तयार करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या यंत्रणेला ‘गरुड नेत्र’ असे नाव देण्यात आले आहे. लवकरच अशा आणखी सहा यंत्रणा तैनात केल्या जातील. या यंत्रणेवर ५१.४१ कोटी रुपये खर्च केला आहे. ही सिस्टिम पठाणकोट ते फाजिल्का पर्यंतच्या ड्रोन हालचालींवर सतत लक्ष ठेवेल. पंजाब पोलिस कर्मचारी बीएसएफशी समन्वय साधून ते चालवतील. यामुळे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीला आळा बसेल. रडार १० किमीच्या अंतरावर ड्रोन शोधतो आणि ते किती अंतरावरून आणि कोणत्या ठिकाणाहून येत आहेत हे सांगतो. ही प्रणाली केवळ हवेत ड्रोनचा मागोवा घेत अडवणार नाही, तर त्याच्या ग्राउंड कंट्रोल स्टेशनचे ठिकाण ओळखण्यासही सक्षम असेल. सीमेवरील हालचालींवर लक्ष पाकसोबत आमची ५३२ किमी लांबीची सीमा लागते. हे तंत्रज्ञान आम्हाला सीमेवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास, ड्रग्ज व शस्त्रे रोखण्यास मदत करेल.” - भगवंत मान, मुख्यमंत्री

What's Your Reaction?






