क्लायमेट रेजिलिएंट फेलोशिपद्वारे जागृतीला प्रारंभ:आसाममध्ये पूर-जलसंकट सोबत, आता 100 गावांचे चित्र बदलताहेत युवा
जलवायू परिवर्तनाचा विचार केल्यास आसाममधील १५ जिल्हे देशातील सर्वात संवेदनशील परिसरापैकी एक आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे येथील अनेक जिल्हे दरवर्षी पुराच्या तडाख्यात सापडतात. त्याचा परिणाम शेतीवरही होतो. या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी आसाम सरकारने २०२२ पासून ‘चीफ मिनिस्टर क्लायमेट रेजिलिएंट व्हिलेज फेलोशिप प्रोग्राम’ सुरू केला. सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनव्हायर्नमंेट काैन्सिलने (एसटेक) या कार्यक्रमांतर्गत युवकांना एक-एक वर्षाची फेलोशिप दिली. युवकांनी जलवायु परिवर्तनाने सर्वाधिक प्रभावित जवळपास १०० गावच्या स्थितीचे आकलन केले. जियोस्पेशल डेटा जमवला. त्याच्या आधारावर वल्नेरेबिलिटी इंडेक्स तयार केला. सरकार या युवकांच्या सूचना धोरणात समाविष्ट करणार आहे. एसटेकमध्ये ज्यूनिअर सायंटिफिक ऑफिसर रितुपर्णा दास सांगतात की, युवकांच्या सूचना आणि तज्ज्ञांचा सल्ला ग्रामीण भागातील लोकांनी मानला. लोक आता अतिरिक्त पावसाची शेतीसाठी बचत करत आहेत. बिगर-पारंपरिक शेतीला प्राधान्य देत आहेत. लोक स्वत:हून झाडे लावत आहेत. - रोमेश साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार. बदलाची तीन उदाहरणे... 1. स्विच गेटमुळे अतिरिक्त पाणीसाठा थांबला नलबाडीच्या गुवाकुचीत अतिरिक्त पाणीसाठ्याची समस्या होती. २००० च्या पुरातही गाव जलमय झाले. दीपम तालुकदार यांनी फेलोशिपअंतर्गत अधिकच्या पावसाचे पाणी नियंत्रित करण्यासाठी स्विच गेटच्या निर्मितीचा सल्ला दिला. पावसाचा काहीही परिणाम होत नसलेल्या मशरूमसारख्या पर्यायी शेतीसाठी लोकांना प्रेरित केले. 2. जैव कुंपणाने मानव-पशू संघर्ष घटला निरोधा पेगू यांनी कामरूप जिल्ह्याच्या हाजोंग बोरी गावचा अभ्यास केला. त्यांना आढळले की, मानव-वन्यजीव संघर्षामुळे (हत्तींमुळे) तांदळाचे पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यासाठी त्यांनी जैव कुंपणाचा सल्ला दिला. आता हा संघर्ष बऱ्याच अंशी कमी झाला आहे. 3. शेतीसाठी बनवले छोटेे-छोटे तलाव कुणाल दास यांनी परमाई गौली गावचा अभ्यास केला. ते सांगतात की, येथे अनियमित पावसामुळे लोकांच्या अनियमित उपजीविकेवर परिणाम होत होता. त्यांनी स्थानिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लँट लावला. आता लोकांनी शेतात छोटे तलाव बांधण्यास सुरुवात केली आहे.

What's Your Reaction?






