100 फुटी तिरंगारॅलीद्वारे फिट इंडियाबाबत जनजागृती:नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवण्यात येतात. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनेतिरंगा रॅलीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या रॅलीत नाशिक सायकलिस्टफाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीशबैजल, अध्यक्ष अमित घुगे, माजीअध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, जॉगर्सक्लबचे अध्यक्ष दीपक भोसले,लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांतपारनेरकर, इंदिरानगर नव वर्ष स्वागतसमितीचे सदस्य, क्रिकेटअसोसिएशनचे युवा खेळाडू तसेचनाशिक सायकलिस्टचे रायडर्स मोठ्यासंख्येने सहभागी झाले. शंभरहूनअधिक लोकांच्या सहभागाने ही रॅलीपार पडली. या रॅलीत पर्यावरण संवर्धनव फिट इंडिया या संकल्पनांचा प्रचार करण्यात आला. सायकल वापराचे आवाहन आजच्या काळात आराेग्याकडे दुर्लक्षहाेत आहे. आराेग्यसंवर्धनासाठीप्रत्येकाने नियमित सायकल चालवावीअसे आवाहन यावेळी करण्यात आले.दरम्यान या तिरंगा रॅलीदरम्यान भारतमाते की जय, वंदे मातरम असाजयघाेष देखील करण्यात आला.नियोजन संचालक कारभारी भोर,दीपाली खैरनार, अश्विनी कोंडेकरयांनी यशस्वीपणे केले. आराेग्यसंवर्धनाचा संदेश स्वातंत्र्यादिनाचे आैचित्य साधत यातिरंगा रॅलीचे आयाेजन करण्यात हाेते.या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्येआराेग्यसंवर्धनाबाबत जनजागृतीकरण्याचा प्रयत्न करण्यात आला. - अमित घुगे, अध्यक्ष, नाशिकसायकलिस्ट फाउंडेशन

What's Your Reaction?






