प्रत्येक घराबाहेर पाणी ठेवून 5 गावांतून डेंग्यू-मलेरियाला केले हद्दपार:या गावांत 20 वर्षांपासून कोणालाही डासजन्य आजार नाही

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात ५ गावांनी पारंपरिक ज्ञानाने डेंग्यू-मलेरिया, चिकुनगुन्या, फायलारियसिससारखे डासजन्य आजार पूर्णपणे संपवून टाकले आहेत. या गावांत २० वर्षांपासून कोणालाही डेंग्यू-मलेरियासारखे आजार झाले नाहीत. या पाचही गावांत घराबाहेर मातीच्या भांड्यात पाणी ठेवून डासांच्या संख्येला वाढण्यापासून रोखले. अंधाऱ्या आणि दमटपणा असलेल्या स्वच्छ ठिकाणी, स्वच्छ पाण्याला आकर्षित होऊन डास त्यात अंडी घालतात. मात्र त्याचे डास बनण्याआधीच लोक हे पाणी उन्हात फेकून देतात. बेल्थांगडी येथील कुथलुर गावच्या एनी मालेकुड़िया सांगतात- एेकण्यास जरा विचित्र वाटेल. वास्तवात आम्ही डासांना अंडी घालण्यासाठी निश्चित जागा देतो. मात्र त्या अंड्यांना डास बनू देत नाही. गावातील प्रत्येक घरात आठवड्यातून ४ ते ५ दिवस असे केले जाते. त्यामुळे जंगलाच्या जवळ राहूनही डासांची संख्या वाढत नाही आणि आम्ही आजारांपासून वाचतो. हा सहज-सोपा, नैसर्गिक आणि प्रभावशाली मार्ग.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चचे (एनआयएमआर) मलेरिया मॉलिक्यूलर बॉयोलॉजिस्ट डॉ. एसके घोष सांगतात- डास नेहमीच साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. पाणी ओतून दिल्याने त्यातून डास बनत नाहीत. त्यामुळे डासांची जीवन शंृखला तुटते. ही पहिल्या टप्प्यातच डासांचे नियंत्रण करण्याची पद्धत आहे. पद्धत... दर तिसऱ्या दिवशी पाण्याचे भांडे उन्हात रिकामे या गावांतील लोक आपल्या घराच्या जवळ पसरट आणि गडद रंगाचे मातीचे भांडे पाण्याने भरून अंधाऱ्या ठिकाणी ठेवतात. या भांड्याची खोली किमान ८ इंच असते. दर तिसऱ्या दिवशी या भांड्यातील पाणी उन्हात फेकून देतात. ही भांडी पुन्हा स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवतात. हा त्यांचा नित्यक्रमच बनलाय. जवळपासच्या १०० गावांनी घराबाहेर पाणी ठेवणे सुरू केले आता गावातील आसपासच्या दक्षिण कन्नड, चिकमंगळुरू आणि कोडागू जिल्ह्यातील १०० गावांनी याच पद्धतीचा अवलंब केला आहे. या गावांतही अनेक घरांच्या बाहेर स्वच्छ पाण्याची भांडी ठेवण्यात येत आहेत. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने हे प्रभावी असल्याचे म्हटले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही पद्धत राज्यातील संपूर्ण गाव, शहरांत अमलात आणण्याच्या सूचना केल्या.

Aug 11, 2025 - 10:04
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile