अवैध हुक्का पार्लरमध्येच गांजा, एमडी अन् दारू:दहा जणांना अटक, गुन्हे शाखा युनिट दोनची रायली प्लॉटमध्ये कारवाई

शहरातील रायली प्लॉट हा मध्यवस्तीचा परिसर आहे. याच परिसरात मागील काही महिन्यांपासून एका घराच्यावर तिसऱ्या माळ्यावर अवैध हुक्का पार्लर सुरू होते. या ठिकाणी खुलेआम हुक्का मिळत होता. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या पार्लरवर धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना या ठिकाणी हुक्काच्या विविध फ्लेवर्ससह एमडी, गांजा आणि दारुसुद्धा सापडली. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई सुरू असताना आरोपींकडून पोलिसांसोबत हुज्जत घालण्यात आली होती. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी ९ ऑगस्टला उशिरा रात्री केली आहे. प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा (५५), पंकज जितेंद्र शर्मा (२९), प्रणय प्रमेंद्र शर्मा (२७, तिघेही रा. रायली प्लॉट, अमरावती), रमन पंडीत वानखडे (३०, वटफळी, नेर), तुषार मोतिराम मनोजा (२१, रा. रामपुरी कॅम्प), आमिर हुसेन अशफाक हुसेन (२४, चपराशीपुरा, ह. मु. धर्मकाटाजवळ अमरावती), यश सुधिर साखरे (२७, रा. कॉग्रेसनगर), राहुल अमरलाल ईसरानी (२४, जयराम नगर), वैभव राजेश जाधव (२७, अंबागेट) आणि अजय बाळकृष्ण माहुले (३५, रा. जुना सातुर्णा, अमरावती) यांना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीनालासुध्दा या ठिकाणाहून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रायली प्लॉट परिसरात राहणारा प्रमेंद्र शर्मा हा त्याच्या घराच्या टेरेसवरच ‘काफीला’ नावाचा हुक्का पार्लर चालवत असल्याची माहीती क्राईमचे एपीआय महेश इंगोले यांना मिळाली होती. या माहीतीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी पोलिसांना हुक्कासाठी लागणारे तंबाखुजन्य सुंगधित फ्लेवर, विदेशी दारु सापडली. त्यामुळे हुक्काच्या ‘कश’सोबतच या ठिकाणी अवैध मार्गाने दारुसुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत होती. पोलिसांनी जावून या पार्लरची झडती घेतली असता हुक्कासाठी लागणारे इतर साहित्य सापडले. तसेच २५ ग्रॅम गांजा आणि ३ ग्रॅम एमडीसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण २ लाख ८७ हजार ४७४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्यांसोबतच आठ ग्राहकांनासुद्धा अटक केली आहे. याचवेळी पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्यांमध्ये अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या तिघांसह चार महिला व आठ ग्राहक असे एकूण १५ जणांविरुद्ध एनडीपीएस कायदा, पोलिसांसोबत वाद घालून कारवाईला विरोध करणे, अवैध हुक्का पार्लर चालवणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या दहा जणांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे पीआय संदीप चव्हाण, एपीआय महेंद्र इंगोले, एपीआय अमोल कडू व पथकाने केली आहे. चार महिलांच्या शोधासाठी विशेष पथक केले नियुक्त ^कारवाईदरम्यान अडथळा निर्माण केल्याच्या कलमांसह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दहा जणांना अटक केली असून, चार महिला पसार आहेत. त्या चारही महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. शहरातील इतरही अवैध हुक्का पार्लरवर कारवाई होणार आहे. संदीप चव्हाण , पीआय गुन्हे शाखा युनिट दोन.

Aug 11, 2025 - 10:03
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile