ब्रह्मदेव जरी आला....लोकसंख्या वाढीवर अजित पवारांनी व्यक्त केली चिंता:सामूहिक प्रयत्नांची गरज; दोन मुलांचे नियम पाळण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या थेट वक्तव्यामुळे कायमच ओळखले जातात. कोणत्याही विषयावर आपले थेट परखड मत ते मांडत असतात. त्यातच पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी लोकसंख्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. यासाठी ब्रह्मदेव जरी खाली आला तर लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सर्वांनी दोन मुलांचे नियम पाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरमधील एका मुलीचा सत्कार करण्याचे उदाहरण दिले. त्यांनी भर दिला की सरकार लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी काम करत असताना, जनजागृती देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी लोकांना लिंगभेद चाचणी न करता "दोन मुलांचे नियम" पाळण्याचे आवाहन केले. सामूहिक प्रयत्नांशिवाय, मजबूत सरकारी उपाययोजना देखील पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. पुणे पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल गेल्या दीड वर्षांत पुणे पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आलेत. यामध्ये ७ नवीन पोलीस स्टेशन, ८१६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया, २८ नवीन कॅमेरे, घाट व टेकड्यांवरील सीसीटीव्ही सुरक्षा प्रकल्प, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज ५ व्हॅनचे लोकार्पण आदी बाबींचा समावेश आहे. यासोबत लोणी काळभोर, नांदेड सिटी, खराडी व कोंढवा पोलीस स्टेशन इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे प्रकल्प साकार होत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आधुनिक आणि जागरूक पुणे घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल त्याचप्रमाणे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ५०३ जंक्शन्सवर 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' बसवण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. या सर्व उपक्रमांमुळे पोलिसिंग अधिक सक्षम होईल, वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल, पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभ्या राहतील. सुरक्षित, आधुनिक आणि जागरूक पुणे घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile