इस्रायल-हमास युद्ध:पॅलेस्टिनींची गर्जना, येथेच राहणार अन् येथेच मरणार; इस्रायलला भीती, ‘ट्रॅप’ होऊ नये गाझा
आंतरराष्ट्रीय दबाव असूनही इस्रायलने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या ‘बिग गाझा प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. संपूर्ण गाझा ताब्यात घेऊन ते इस्रायलमध्ये विलीन करण्याच्या या योजनेमुळे पुन्हा एकदा २३ लाख लोकसंख्या असलेल्या गाझामधून १० लाखांहून अधिक पॅलेस्टिनींचे विस्थापन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तथापि, इस्रायली सैन्याच्या लष्करी कारवाईनंतरही, पॅलेस्टिनी गाझामधील त्यांची घरे सोडण्यास तयार नाहीत. या युद्धात आपला २३ वर्षांचा मुलगा गमावलेले ४७ वर्षीय इब्राहिम अबू अल-हुस्नी म्हणतात, ‘मी हे शहर सोडणार नाही. मी येथेच राहीन आणि येथेच मरेन.’ इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली असली तरी, इस्रायली सैन्याच्या सर्वोच्च नेतृत्वाने या योजनेवर चिंता व्यक्त केली आहे. चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी इशारा दिला की हे पाऊल ‘सापळा’ ठरू शकते, ज्यामुळे उर्वरित २० ओलिसांचे जीवन धोक्यात येईल आणि थकलेल्या सैन्यावर अतिरिक्त भार पडेल. माजी मेजर जनरल गादी शमानी म्हणतात की या निर्णयामुळे हमासचा पराभव होणार नाही परंतु त्यामुळे अधिक जीवितहानी होईल. अमेरिकी फंडिंग: २०२८ पर्यंत दरवर्षी ३१ हजार कोटी सैन्य मदत ब्रिटन-फ्रान्स भूमिका: राजकीय दबाव अन् इस्रायलला संदेश देणे गाझामधील उपासमारीमुळे युरोपीय नेत्यांवर देशांतर्गत दबाव आहे. फ्रान्ससारखे देश, ज्यात मुस्लिम आणि ज्यू दोन्ही लोकसंख्या मोठी आहे, राजकीय दबावाखाली आहेत. पॅलेस्टाईनला मान्यता देऊन, युरोपीय देश इस्रायलवर राजनैतिक दबाव आणू इच्छितात जेणेकरून ते संभाव्य विलयीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करतील. अरब देश गप्प का: अस्थिरता , अमेरिकेच्या नाराजीची भीती वाळूत धान्य शोधताना... हे चित्र गाझा शहराचे आहे, जिथे वृद्ध पॅलेस्टिनी महिला उम्म साद तिच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वाळूमध्ये धान्य शोधत आहे. खरं तर, विमानांनी हवेतून टाकलेल्या मदत साहित्याच्या पाकिटांच्या फाटण्यामुळे धान्य वाळूमध्ये मिसळले गेले. आता ही महिला चाळणीतून तांदूळ, मसूर आणि सोयाबीनचे दाणे वाळूतून वेगळे करत आहे. आरोग्य: ९४% रुग्णालये बंद, ९०% लोक टेंटमध्ये राहतात उपासमार: अद्याप २१२ मृत्यू, यात ९८ मुलांचा समावेश मृत्यूची रांग: रोज अन्न घेताना २१ नागरिकांचा मृत्यू गाझा सिटी| हे चित्र गाझा शहराचे आहे, जिथे २१ महिन्यांच्या युद्धामुळे बहुतेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. विमानांमधून टाकले जाणारे मदत साहित्य घेण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिक भटकताना दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोकांनी हवेतून टाकलेले मदत साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली आणि अन्नाचे पॅकेट जमिनीवर पडताच लोक जमा होतात.यादरम्यान बॉम्बस्फोट व गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. अशा स्थितीनंतरही लोक त्यांच्या कुटुंबांसाठी अन्न गोळा करण्याचा प्रयत्न करत राहिले. गाझात मदत सामग्रीसाठी भटकताना लोक सिडनी| गाझामध्ये उपासमारीने मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, इस्रायलवर युद्ध संपविण्यासाठी दबाव आणण्यासाठी जगभरात चळवळी सुरू आहेत. ३ ऑगस्ट २०२५ रोजी ऑस्ट्रेलियातील अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली.

What's Your Reaction?






