‘एआय’च्या वापराने संत्रा बागेतून सहापटीने वाढले उत्पन्न:अमरावतीतील खरपी येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न 5 लाखांवरून आता 30 लाख
खरपी येथील शेतकरी विजय बिजवे व त्यांचा कृषी पदवीधर मुलगा गौरव बिजवे यांनी त्यांच्या ८ एकर संत्रा बागेमध्ये मागील ८ महिन्यांपूर्वीच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा वापर सुरू केला. त्याची फलश्रुती म्हणून वर्षाकाठी ५ लाखांचे उत्पन्न देणाऱ्या बागेतून यंदा त्यांना सुमारे ३० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. विजय यांनी एका कंपनीच्या मदतीने एआय प्रणाली कार्यान्वित केली. याअंतर्गत त्यांनी शेतात पाच प्रकारचे सेन्सर लावले. हे पाचही सेन्सर उपग्रह तंत्रज्ञानाला जोडले आहेत. त्यामुळे बागेतील जमिनीला कोणत्या पोषक तत्त्वांची कमतरता आहे, कुठल्या भागात पाणी हवे किंवा पाणी जास्त झाले आहे. झाडांना नेमके कोणते औषध फवारावे यासह झाडांच्या वाढीसाठी व फळांच्या उत्तम दर्जासाठी कोणत्या वेळी काय करावे, ही सर्व माहिती बिजवे यांना वेळेच्या वेळी मिळते. त्यामुळे सध्या त्यांच्या बागेत १५ वर्षे वयाची झाडे असून उत्तम दर्जाची फळे झाडाला लगडली अाहेत. विजय पूर्वी या बागेसाठी वर्षभरात एकरी ६० ते ७० हजार खर्च करत होते. त्या वेळी त्यांना ४ ते ५ लाखांचे उत्पन्न मिळायचे. ‘एआय’च्या माध्यमातून असे हाेते काम शेतात एका ठिकाणी १२ फूट उंच पाइप उभा केला अाहे. त्यावर साेलार प्लेट बसवली असून त्यातून पाच सेन्सरला ऊर्जा पुरवठा हाेताे. पाचपैकी दोन सेन्सर हे जमिनीतील ओलावा दर्शवतात. तिसरा सेन्सर मातीचे तापमान, चौथा सेन्सर तापमानातील अार्द्रता अाणि पाचवा सेन्सर हवामानाची माहिती देताे. या सर्व सेन्सरमुळे पिकाची वाढ, पाणी, पिकामधील अन्नद्रव्याची माहिती हाेते. यातून वेळीच उपाययाेजना करण्यात येतात. त्यामुळे उत्पादकता वाढली आहे. या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती 7028110035

What's Your Reaction?






