बियांच्या राख्या झाडाला बांधून घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ:वृक्ष संवर्धन चळवळीची शहरात चांगली सुरुवात, मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे‎

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये सहावी ‘ई’ च्या विद्यार्थीनींनी पर्यावरणपूरक उपक्रम साजरा करत झाडाला राखी बांधून आगळे वेगळे वृक्षाबंधन साजरे केले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर महानगरपालिका, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांच्या बियांपासून विद्यार्थिनींनी झाडांचे संरक्षण करणे ही काळाची असलेली गरज या उपक्रमामधून दाखवून दिली आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले. बहिणीने भावाला राखी बांधल्याने तो तिचे संरक्षण करतो ही परंपरा आहे. परंतु या विद्यार्थीनीनी झाडालाच आपला भाऊ मानला आहे. त्याला राखी बांधून त्याचेच संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन एक नवीन परंपरा सुरू केली आहे. स्काऊट गाईड अंतर्गत बनवलेल्या पर्यावरण पूरक राख्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सहावी ‘ई’ च्या विद्यार्थ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांच्या बियांपासून राख्या बनवून राखी स्टॉल उभारला. विद्यार्थ्यांनी झाडांच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेत वर्षभर झाडांना पाणी देत राखलेले प्रेमाचे नाते व पर्यावरण संवर्धनाबाबत सामाजिक जबाबदारीची जाणीव सर्वांना करून दिली. या माध्यमातून वृक्ष संवर्धन चळवळीची चांगली सुरुवात शहरात झाली असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे. मुख्याध्यापक उल्हास दुगड म्हणाले की, या मुलींनी भविष्यात कोणतेच झाड तोडणार नाही, अशी शपथ देखील घेतली. झाडांच्या संगोपानाबरोबर नवीन झाडे लावण्याचा संकल्पही या मुलींनी केला आहे. मुलींनी हा पर्यावरणपूरक उपक्रम साजरा करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. राखीच्या नात्याला हरित स्पर्श या उपक्रमात 'आम्ही तुझे रक्षण करतो, तू आमचे रक्षण कर...' या ब्रीदवाक्याने झाडांशी बंध जुळवत, विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या निलमोहोर, बहावा, कडुनिंब आदी झाडांना राख्या बांधून त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. मोठ्यांनी आदर्श घ्यावा मोठ्या माणसांनी याचा आदर्श घेऊन हा उपक्रम राबवण्याची गरज आहे. तरच झाडे वाचवली जातील आणि दरवर्षी ढळणारा पर्यावरणाचा समतोल राखण्यास काही का होईना हातभार लागेल. - मुख्याध्यापक उल्हास दुगड

Aug 11, 2025 - 10:03
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile