"वंदे भारत'चे अकोलेकरांकडून स्वागत:देशातील सर्वांत लांब वंदे भारत सेवा; महाराष्ट्रातील बारावी
अकोला रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रायल रनचे शनिवारी स्वागत करण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आठ मिनिटे थांबलेल्या या गाडीचे जल्लोषात स्वागत केले. खा. अनुप धोत्रे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रायल रेल्वे दुपारी २ वाजता अकोला स्थानकावर दाखल झाली. यावेळी नागरिक, विद्यार्थी, पालक, रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीसमोर वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी कार्यक्रम झाला. पाच विद्यालयांनी सहभाग घेत स्पर्धा आयोजित केल्या. विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. उर्वरित पान ४ ही एक्स्प्रेस ८८१ किलोमीटरचे अंतर कापणारी देशातील सर्वांत लांब वंदे भारत ट्रेन असेल. महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत ट्रेन असून, वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि पुणतांबा, दौंड भागात ही पहिली वंदे भारत ट्रेन आहे. नागपूर- पुणे दरम्यानची ही सर्वात जलद ट्रेन असून, सरासरी वेग ७३ किमी प्रति तास आहे. गाडीला १० प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी सेवेत असेल.

What's Your Reaction?






