रामायणकालीन लाखपुरीतील श्री लक्षेश्वर मंदिर:साडेअकरापैकी अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्या पैलतिरी, दरवर्षी 6 लाख जण घेतात दर्शन
मूर्तिजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वरमंदिराला रामायणकालीन महत्त्वअसून श्रीराम यांच्या बंधूंनी याठिकाणी पूर्णा नदीच्या तीरावरलक्षेश्वर महादेवाची स्थापनाकेल्याची आख्यायिका आहे. याठिकाणी साडेअकरा ज्योतिर्लिंगअसून अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्यापैलतिरी आहे. जर हे पूर्ण बाराज्योतिर्लिंग झाले असते तर याठिकाणाला प्रचंड महत्त्व असते,असेही स्थानिक सांगतात. तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्रीलक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथेदरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्राभरते. यात्रेनिमित्त भक्तांची अलोटगर्दी असते. लाखोंच्या संख्येनेभाविक येथे दर्शनाकरीता येतात.मनोकामना पूर्ण व्हावी याकरिताअभिषेक केला जातो. या गावाचेनाव आधी लक्ष्मणपुरी होते.कालांतराने लाखपुरी नाव झाले.ऐतिहासिकदृष्ट्या लाखपुरी गावाचेविशेष महत्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारीपूर्णा नदीच्या पवित्र जलानेमहादेवाला अभिषेक करण्याचीपरंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे.श्रावणात अखंड हरिनाम सप्ताहसुरू असतो. दरवर्षी श्रावणमहिन्याच्या शेवटच्या रविवारी येथेमोठी यात्रा भरते. लक्षेश्वर येथूनपूर्णा नदीचे पवित्र जल कावडीनेअंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर तालुक्यासह इतरत्र बऱ्याच ठिकाणचेकावडधारी भाविक कावडीद्वारापवित्र जल घेऊन जातात. आपापल्यागावात कावड यात्रा आयोजित केल्याजाते आणि पूर्णा नदीच्या पवित्रजलाने महादेवाला जलाभिषेककेल्या जातो. कावडधारी भक्तांसाठी वमहाशिवरात्रीनिमित्त संस्थेतर्फेमहाप्रसादाची व्यवस्था केली जाते.भक्तांनी परिसर फुलून जातो. संपूर्णमहाराष्ट्राला कवितांच्या माध्यमातून सुपरिचितअसलेले कवी उ. रा. गिरीलाखपुरी गावातील होते.अमरावती विद्यापीठाने बी. ए.भाग २ मध्ये त्यांच्या //"मार्गा वरुनमाझ्या मी एकटा निघालो,डोळ्यात चंद्र जखमी मी एकटानिघालो'' या कवितेचाअभ्यासक्रमात समावेश केलाआहे. लाखपुरी तीर्थक्षेत्र प्रति काशीम्हणून ओळख असणारे गावआहे. श्रावणात येणाऱ्या भाविकांसाठीलक्षेश्वर संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.भाविकांकरिता श्रीलक्षेक्ष्वरसंस्थांनकडून शुद्ध पिण्याचे पाणी,वाहन तळ, तैराकी पथक,आपत्कालीन पथक, स्वागत कमानअशी व्यवस्था केली आहे. कावडयात्रेनिमित्त भाविकांना कुठल्याहीप्रकारचा त्रास होऊ नये म्हणून चोखव्यवस्था करण्यात येते. रुग्णवाहिका,डॉक्टरांचे तपासणी पथक,महाप्रसाद, आपत्कालीन पथकसज्ज ठेवण्यात येते. कायदा वसुव्यवस्था राखण्यासाठी मूर्तिजापूरग्रामीण पोलिस व शहरपोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येतअसतो. साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेले विदर्भातील एकमेव मंदिर साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेलेविदर्भातील हे एकमेव मंदिर आहे.मंदिरात दगडात कोरलेलीमहादेवाची पिंड, शंकर मंदीर,विठ्ठल मंदीर, दत्तात्रेय मंदीर तसेचइतरही अनेक मूर्ती व नंदीबैलभाविकांना आकर्षित करतात.ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे पुरातन मूर्तीअसलेले मंदिर लाखपुरी येथे आहे.

What's Your Reaction?






