इगतपुरीत अवैध कॉल सेंटरवर छापा:मुंबईचे 5 अटकेत; अमेरिका, कॅनडासह 5 देशांच्या नागरिकांना अॅमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गंडा

दिल्ली व मुंबई सीबीआयने इगतपुरीत रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये चालणाऱ्या अवैध कॉल सेंटरवर छापा टाकत तब्बल सव्वा कोटीची रोकड, अर्धा तोळा सोने व एक कोटीच्या सात लक्झरी कार जप्त केल्या. याप्रकरणी मुंबईतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडासह पाच देशांतील नागरिकांची फसवणूक करत होते. या कारवाईत 62 ऑपरेटर कार्यरत, 44 लॅपटॉप, 71 मोबाईल, 2 हजार कॅनडेयिन डॉलर, 1.26 लाख गिफ्ट व्हॉउचर, 7 लक्झरी कार जप्त करण्यात आले आहे. विशाल यादव, शाहबाज, दुर्गेश, अभय राज ऊर्फ राजा, समीर ऊर्फ कालिया ऊर्फ साेहिल या मुंबईतील पाच जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर रिसॉर्टमध्ये घेतलेल्या खोल्यांत बहुधा रात्रीचेच काम सुरू असायचे. छाप्यावेळी ६२ अॉपरेटर काम करत होते. दरम्यान, इगतपुरीचे पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कारवाईचा मागमूसही नव्हता. यावरून ते अनभिज्ञ कसे असा सवाल उपस्थित हाेऊन त्यांच्याच मर्जीने तर हा अवैध व्यवसाय सुरू तर नव्हता ना अशीदेखील दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. असे करायचे तीन टप्प्यांत फसवणूक कॉल सेंटरमध्ये त्रिस्तरीय यंत्रणा होती. पहिल्या टप्प्यात डायलर म्हणून काही ऑपरेटर काम करायचे. ते आधी ग्राहकांना फोन करुन जाळ्यात ओढायचे. दुसऱ्या टप्प्यात व्हेरिफायर तर तिसऱ्या टप्प्यात क्लोजर म्हणून काही काम करायचे. सीबीआयने १० दिवसांपूर्वी पुण्यात फोडलेल्या रॅकेटमध्येही फसवणुकीची हीच मोडस ऑपरेंडी होती. दोन्ही ठिकाणच्या संशयितांचे कनेक्शन असण्याची शक्यता आहे. तसेच, या रॅकेटचे अमेरिका, कॅनडातही हस्तक असल्याचा संशय सीबीआयने वर्तवला असून त्या दिशेने तपास सुरू आहे. राज्यात ५ महिन्यांत २ कारवायांमध्ये ६.२१ काेटी जप्त २३ फेब्रु. २०२५, नाशिक फसवणूक : २.४० काेटी. ८ अटकेत सद्य:स्थिती : दाेषाराेपपत्र दाखल २७ जुलै २०२५, पुणे फसवणूक : ३.८१ काेटी. ३ अटकेत सद्य:स्थिती : आणखी आराेपींचा शाेध गिफ्ट कार्ड, बिटकॉइनमध्ये दामदुपटीचे आमिष, महिन्याला ५ काेटींवर कमाई ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गिफ्ट कार्डचे आमिष दाखवून नागरिकांना आधी जाळ्यात ओढले जायचे. लॅपटाॅप, माेबाईलमध्ये व्हायरस शिरल्याचे सांगतही २०० ते २ हजार डाॅलर्सपर्यंतचा खर्च सांगून काम झाल्यावर लगेच गिफ्ट कार्ड देण्याचे सांगून फसवले जायचे. काहींना बिटकाॅइनमध्ये दुप्पट कमाईचा फंडा दाखवला जायचा. यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने पाेस्ट दाखवून त्यांनी कसे पैसे कमावले हे दाखवले जायचे. महिन्याकाठी ५ काेटींची रक्कम ग्राहकांना फसवून मिळवली जायची. काही बँक अधिकाऱ्यांचाही यात सहभाग उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aug 11, 2025 - 10:03
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile