पुण्यातील वाहतूक वेग प्रतितास 30 किमी करण्याचा प्रयत्न:पुढील 30 वर्षांसाठी 1 लाख 30 हजार कोटींचा विकास प्रकल्प राबवणार - मुख्यमंत्री फडणवीस

पुणे शहरातील वाहतूक वेग सध्या प्रतितास १९ किलोमीटरपेक्षा कमी आहे. हा वेग प्रतितास ३० किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीला गती देण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत विशेष प्रयत्न केले जातील. पुण्याच्या पुढील ३० वर्षांच्या नियोजनासाठी एक लाख ३० हजार कोटी रुपयांचा एकत्रित मोबिलिटी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ६५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येईल. सध्या पुण्यात दोन हजार सार्वजनिक बसेस आहेत. आगामी काळात हा आकडा सहा हजार इलेक्ट्रिक बसेसपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शुक्रवारी पुण्यातील राज्यस्तरीय पायाभूत सुविधांबाबत दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. कमी वेळात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे ठरवले आहे. राज्यात नऊ लाख कोटींचे प्रकल्प सुरू असून ते लवकर पूर्ण झाल्यास जनतेला फायदा होईल. पुणे शहर आणि परिसराचा पुढील ३० वर्षांचा विकास लक्षात घेता एकत्रित विकास प्रकल्प तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात २२०० चौरस किलोमीटर परिसर समाविष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर पहिल्या टप्प्यात ३० टक्क्यांपर्यंत आणि नंतर ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. पुण्यात वाहनांची संख्या मोठी असून रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जमिनीखालून रस्ते तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एकमेकांना जोडणारे भूमिगत बोगदे तयार करण्याचेही नियोजन आहे. मुख्यमंत्र्यांनी देशात मुंबई, नागपूर आणि पुण्यातील मेट्रोचे काम सर्वात वेगाने सुरू असल्याचेही सांगितले.

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile