गझलदीप पुरस्कार पंढरपूरचे प्रसिद्ध गझलकार वैभव कुलकर्णी यांना प्रदान:गझल करताना संयम आणि तटस्थता आवश्यक, गझलभान निर्माण करणे महत्त्वाचे

कवीने गझलभान निर्माण करीत रहावे. मुळात गझलभान असते का आणि ते निर्माण करता येते का, अशी चर्चा केली जाते. गझल करताना संयम आणि तटस्थता आवश्यक असते असे मत प्रसिध्द गझलकार वैभव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे सुप्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गझलदीप पुरस्कार पंढरपूरचे प्रसिध्द गझलकार वैभव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना वैभव कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आणि सल्लागार अॅड. विलास अत्रे उपस्थित होते. यावेळी बोलताना वैभव कुलकर्णी म्हणाले की, गझलभान निर्माण होण्यासाठी विशिष्ट अभ्यास करावा लागतो आणि जाणीवा जोपासाव्या लागतात. गझलभान बाळगणे हे प्रतिभेचे लक्षण आहे. हे भान केवळ गझलकारापुरते मर्यादित नसून रसिकांचे देखील आपण गझलभान वाढवू शकतो. गझल करताना केवळ आकृतिबंध समजून घेणे पुरेसे नसून निरीक्षण देखील आवश्यक असते. गझल करताना दिशा आणि ध्येय ठरवावे लागते. गझल निर्माण होण्याची प्रक्रीया गांभीर्याची तसेच जबाबदारी आणि जोखमीची देखील आहे. गझल निर्मिती ही एक उपासना असून ती उपासकांकडून काहीतरी वेगळे मागत असते. गझलच्या तंत्र-मंत्रांचा अभ्यास बारकाव्याने करीत राहिल्यास हळुहळू गझल दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागते. गझल ही साक्षात्काराची प्रत्ययकारी जाण असते. गझलकाराला सौंदर्य आणि सत्य या दोन्हीचे भान आणि समज असली पाहिजे. गझल ही सहानुभूती नव्हे, तर समानभुती असली पाहिजे. गझल स्वतःपासून सुरू होऊन शोधण्याची प्रक्रीया आहे. सुक्ष्मतेकडून विराटतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजे गझल असते. गझलकाराने सौंदर्यभान बाळगत शब्द, प्रतिभा, अर्थ आणि मांडणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, यातच गझलचे सौंदर्य दडलेले आहे.

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile