मोठी बातमी:कोल्हापूर मधील माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप;  वनतारा सारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा

कोल्हापूर मधील माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाने आक्षेप घेतला आहे. माधुरीला मुक्तपणे फिरण्यासाठी एक शांत जागा, तिच्या वेदना कमी करण्यासाठी आणि तिच्या आजारी पायांना व्यायाम देण्यासाठी एक तलाव आणि तिच्या अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रगत पशुवैद्यकीय उपकरणे आणि कौशल्याची आवश्यकता आहे. वनतारा हे सर्व प्रदान करते आणि सध्या महाराष्ट्रात अशी दुसरी कोणतीही सुविधा नसल्याचा दावा PETA ने केला आहे. जर हे चित्र बदलले आणि महाराष्ट्रात तशा सुविधा तयार झाल्या तर, PETA इंडिया तिच्यावर उपचार करण्यास विरोध करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात पेटा इंडियाने म्हटले की, माधुरीच्या, हत्तीच्या अंतिम भवितव्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांची आम्हाला जाणीव आहे आणि तिच्यासाठी सर्वोत्तम मिळले अशी आशा आहे. 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाशी आम्ही सहमत आहोत. तिची खराब प्रकृती पाहता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माधुरीच्या आरोग्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य दिले पाहिजे. ज्याप्रमाणे मानवांना कधीकधी रुग्णालयात दाखल करणे, त्यांची व्यापक स्वरुपात काळजी घेणे आणि कामातून काही काळानंतर निवृत्तीची आवश्यकता असते. तसेच हत्तींना देखील असते. ज्याप्रमाणे मानवांना आपल्या जवळ इतर मानवांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे हत्तींना इतर हत्तीसोबत राहण्याची आवश्यकता असते. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हत्तींमध्ये मातृसत्ताक कुटुंब आहेत जे कौटुंबिक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. माधुरीला वनताराच्या राधे कृष्ण मंदिर एलिफंट वेल्फेअर ट्रस्टमध्ये तिच्या इतर हत्ती मित्रांना भेटताना एकदा पहा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. माधुरीला आरोग्यासाठी पशुवैद्यकीय काळजी, हत्तींच्या सहवासाची गरज मुख्य चिंतेची बाब म्हणजे माधुरीला तिच्या आरोग्यासाठी विशेष पशुवैद्यकीय काळजी आणि इतर हत्तींच्या सहवासाची फार पूर्वीपासून गरज आहे. म्हणूनच तिला उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय उपचार, साखळदंडांपासून मुक्तता आणि काळजी मिळावी यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून समर्थन करतो. तिला ग्रेड-4 चा संधिवात आहे. यामध्ये वेदनादायक पाय कुजणे यासारखे लक्षणे दिसून येतात. हे हत्तींमध्ये गंभीर मानसिक त्रासाचे लक्षण असल्याचेही पेटा इंडियाने म्हटले आहे. त्रासलेले हत्ती अनेकदा हल्ला करतात 33 वर्षे एकाकीपणात आणि कडक काँक्रीट वर राहिल्यानंतर न्यायालयाने तिला नवीन जीवन देण्याचा निर्णय दिला आहे. ज्यामुळे तिच्या वेदना आणि यातना दूर होत आहेत. वास्तविक असे त्रासलेले हत्ती अनेकदा हल्ला करतात. माधुरीने तसे वर्तन दाखवून दिले असून तिने आधीच प्रमुख स्वामीजींना मारले असल्याचा दावा देखील पेटा इंडियाने केला आहे. त्यामुळे शांततापूर्ण निवृत्ती, साखळी मुक्त राहणे आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान दोन्हीवर उपचार करणे हे माधुरी साठी सर्वात महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile